बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:50 PM2021-03-26T16:50:15+5:302021-03-26T16:51:08+5:30

या वेळी भाजपला तृणमूल काँग्रेसचा खास प्रतिस्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही पक्ष एक-मेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Union home minister Amit Shah's reaction on the questioned about buying house in west bengal | बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

Next

कोलकाता - विधानसभा निवडणूक प्रचाराने पश्चिम बंगाल (West Bengal) पार ढवळून निघाला आहे. या वेळी भाजपला (BJP) तृणमूल काँग्रेसचा (TMC) खास प्रतिस्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही पक्ष एक-मेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे भाजप टीएमसीला सातत्याने भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या मुद्द्यावर घेरत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने भाजपच्या बंगालमधील प्रवेशाला 'बंगाली' विरुद्ध 'बाहरी', असा मुद्दा बनवले आहे. यातच गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एका टीव्ही चॅनलवर स्वतः बाहेरील असल्याशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर दिले आहे. (Union home minister Amit Shah's reaction on the questioned about buying house in west bengal)

अमित शाह यांना एबीपी न्यूजच्या (बंगाली वाहिनी) अँकरने विचारले, “बंगालमध्ये एक म्हण आहे, 'डेली पॅसेन्जर' अर्थात रोज एकाच ठिकाणी जाणे. तर आपला पश्चिम बंगाल दौरा आठवड्यातून किमान दोन दिवस अथवा कधी-कधी तीन दिवसही असतो. मग आपण तर येथे एक घर अथवा फ्लॅट विकत घ्यायला हवा. आम्हालाही म्हणता येईल, की देशाच्या गृह मंत्र्यांचे बंगालमध्ये घर आहे आणि आपले विरोधकही आपल्याला 'बाहरी' म्हणू शकणार नाहीत.”

नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

पत्रकाराच्या या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, बाहेरील असल्याचाच प्रश्न असेल, तर माझा पक्ष अखिल भारतीय पक्ष आहे. माझा पक्ष स्थानिक पक्ष नाही. तर मग माझ्या पक्षाचे सर्वच नेते ममता दीदींच्या मते बाहेरीलच झाले. तर मी त्यांना एक छोटा प्रश्न विचारू इच्छितो, की सुभाष बाबू जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा ते गुजरातसाठी बाहेरील होते का? प्रणव मुकर्जी देशाचे राष्ट्रपती झाले, तर ते मध्य प्रदेशसाठी बाहेरील होते का? हा कसला संकुचित विचार आहे, हा बंगालचा विचार असू शकत नाही. हा अत्यंत संकुचित विचार आहे.

आपल्या बंगाल दौऱ्याच्या प्रश्नावर शाह म्हणाले - “जर माझ्याच दौऱ्याचा प्रश्न असेल, तर बंगालमध्ये आम्ही सर्वाधिक जागांवर निवडणूक लढत आहोत. यामुळे मी येथे अधिक वेळा येणे साहजिकच आहे. पण मला कळत नाही, की मी येथे आल्याने दीदींना काय त्रास होतो?" असा सवालही शाह यांनी यावेळी केला. 

ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा: अमित शाह

ममता सरकारमध्ये 115 घोटाळे -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यापूर्वी, पुरुलिया जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी ममतांवर जोरदार निशाणा साधला होता. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असा निशाणा अमित शाह यांनी ममतांवर साधला होता.

Web Title: Union home minister Amit Shah's reaction on the questioned about buying house in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.