West Bengal Election 2021: टीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी शेतातून पळवून लावले; भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:55 PM2021-04-07T14:55:20+5:302021-04-07T14:57:49+5:30

west bengal assembly election 2021: टीएमसी उमेदवार एका गावात प्रचार करण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांनी पळवून लावल्याची घटना घडली आहे. यासाठी टीएमसीने भाजपला जबाबदार धरले आहे.

west bengal assembly election 2021 tmc candidates ran through the fields after villagers come with sticks | West Bengal Election 2021: टीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी शेतातून पळवून लावले; भाजपवर आरोप

West Bengal Election 2021: टीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी शेतातून पळवून लावले; भाजपवर आरोप

Next
ठळक मुद्देटीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी लावले पळवूनया घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोपनिवडणूक आयोगाकडे टीएमसीने केली तक्रार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) तिसऱ्या टप्प्यात भरघोस मतदान झाल्यानंतर आता चौथ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. १० एप्रिल रोजी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार होणार आहे. या पार्श्वभूमीवर टीएमसी उमेदवार एका गावात प्रचार करण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांनी पळवून लावल्याची घटना घडली आहे. यासाठी टीएमसीने भाजपला जबाबदार धरले आहे. (tmc candidates ran through the fields)

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. आरमबाग येथून सुजाता मंडल तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. एका गावात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या असताना, गावकऱ्यांनी त्यांना गावातून पळवून लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याची टीका करत टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सुजाता मंडल एका शेतातून गावात प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र, त्या गावात येत आहे, हे पाहताच काही गावकरी काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. गावकरी काठ्या घेऊन येत असल्याचे पाहताक्षणी सुजाता मंडल आणि त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनी तेथून पळ काढला. 

West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा

घटनेसाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप

सुजाता मंडल यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरले असून, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दगड आणि विटा घेऊन मास्क लावलेले काही जण त्यांच्यावर धावून गेले, असे म्हटले जात आहे. सुजाता मंडल या भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी असल्याचे सांगितले जाते. मात्र, सुजाता मंडल यांची तृणमूल काँग्रेसमधील जागा बळकट असून, पक्षात चांगले वजन असल्याचे बोलले जाते. 

निवडणूक आयोगाकडे तक्रार

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी या घटनेनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आरमबाग येथील बूथ क्रमांक २६३ वर हल्ला झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यात सुजाता मंडल जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. 

Farmers Protest: भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

दरम्यान, हुगली भागात भाजप नेते जेपी नड्डा यांच्या तीन प्रचारसभा होणार होत्या. मात्र, तीन पैकी दोन प्रचारसभा रद्द करण्यात आल्या. या प्रचारसभा रद्द करण्यामागे गर्दी होत नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, भाजपकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला असून, काही अपरिहार्य कारणामुळे जेपी नड्डा यांच्या दोन प्रचारसभा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: west bengal assembly election 2021 tmc candidates ran through the fields after villagers come with sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.