West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 09:16 AM2021-04-07T09:16:54+5:302021-04-07T09:18:30+5:30

west bengal assembly election 2021: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हुगली येथे होणाऱ्या दोन प्रचारसभा रद्द केल्या आहेत.

west bengal assembly election 2021 bjp j p nadda cancelled two rally in hugli | West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा

West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा

Next
ठळक मुद्देजेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्दचौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी सभाभाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या सबबी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) तिसऱ्या टप्प्यात भरघोस मतदान झाल्यानंतर आता चौथ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हुगली येथे होणाऱ्या दोन प्रचारसभा रद्द केल्या आहेत. मात्र, गर्दी नसल्यामुळे या सभा रद्द केल्याची दबक्या आवाजात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. (j p nadda cancelled two rally in hugli)

हुगली येथे पुढील टप्प्यातील मतदान होणार आहे. अलीकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी या भागात प्रचारसभा घेतली होती. यावेळी बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याच हुगली भागात भाजप नेते जेपी नड्डा यांच्या तीन प्रचारसभा होणार होत्या. मात्र, तीन पैकी दोन प्रचारसभा रद्द करण्यात आल्या. या प्रचारसभा रद्द करण्यामागे गर्दी होत नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सीआरपीएफची माहिती

काही अपरिहार्य कारणामुळे सभा रद्द

टेलिग्राफ वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, हुगली येथील जेपी नड्डा यांनी प्रचारसभांना गर्दी जमत नसल्यामुळे ऐनवेळी येण्याचा नकार दिला आणि त्यामुळे सभा रद्द झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, भाजपकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला असून, काही अपरिहार्य कारणामुळे जेपी नड्डा यांच्या दोन प्रचारसभा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

प्रत्येकाची कारणे वेगवेगळी

पश्चिम बंगालमधील भाजप नेते शायंतन बसू यांनी म्हटले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ते सभेच्या ठिकाणी पोहोचू शकले नाही, तर भाजपच्या काही नेत्यांच्या मते कोलकाता येथे काही कामे अपूर्ण राहिल्याने जेपी नड्डा यांना तेथेच थांबावे लागले. तर, स्थानिक नेत्यांनी दावा केला की, गर्दी जमत नसल्यामुळे जेपी नड्डा सभेला आले नाहीत आणि हा शुभ संकेत नसल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. यासाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. मात्र, हुगली येथे बोलताना याचाच आधार घेत, आता एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि पुढे नंतर दोन्ही पायांवर दिल्लीही जिंकेन, असा दावा केला आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यामागे भाजपवाल्यांचे कारस्थान आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेण्याची गरजच नव्हती, असा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी हुगली येथे केला.
 

Web Title: west bengal assembly election 2021 bjp j p nadda cancelled two rally in hugli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.