Farmers Protest: भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 10:35 AM2021-04-07T10:35:52+5:302021-04-07T10:37:50+5:30

Farmers Protest: भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत.

rakesh tikait claims that bjp leaders are also joining us and kisan mukti abhiyan will run | Farmers Protest: भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

Farmers Protest: भाजप नेतेही आमच्यासोबत, आता किसान मुक्ती अभियान: राकेश टिकैत

Next
ठळक मुद्देराकेश टिकैत यांचा गुजरात दौराभाजप नेते आमच्यासोबत असल्याचा दावाकिसान मुक्ती अभियान चालवण्याचे संकेत

गांधीनगर : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. तर, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. राकेश टिकैत (Rakesh Tikait) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शेतकरी आंदोलनाशी भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते जोडले जात आहेत, असा दावा यानंतर किसान मुक्ती अभियान चालवले जाईल. हे आंदोलन आता अधिक काळ चालेल, असे टिकैत यांनी म्हटले आहे. (rakesh tikait visit in gujarat)

राजस्थानमधून राकेश टिकैत गुजरातमध्ये दाखल झाले. गुजरातमध्ये काही किसान महापंचायतींना ते संबोधित करत आहेत. गुजरात दौऱ्यावर असताना राकेश टिकैत अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. संसदेला घेराव घालण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे टिकैत म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी; गुजरातमध्ये राकेश टिकैत यांची महापंचायत

भाजप नेते आमच्यासोबत

भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्यासोबत असून, ते शेतकरी आंदोलनाशी जोडले गेले आहेत. गुजरातमध्ये पोलीस राज सुरू असल्याचा आरोपही टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. गांधीनगरला घेराव घालण्याची वेळ आली आहे. साबरमतीमधील शेतकरी नाखुश आहेत. गरज भासल्यास शेतकरी बॅरिकेट्स तोडून पुढे जातील, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे. 

आंदोलनात कसे सहभागी व्हायचे हे तुम्ही ठरवा

गुजरातमधील शेतकऱ्यांनी आंदोलनात कसे सहभागी व्हायचे, हे तुम्हीच ठरवायला हवे. युवकांनी, तरुण वर्गाने अधिकाधिक संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला हवे, असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. केंद्र सरकार संपूर्ण देशात गुजरात मॉडेल लागू करू इच्छिते, अशी टीका करत रिलायन्सला ६० गावे देऊन टाकली. तसेच देशभरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनी, व्यवसायिकांना देऊन टाकण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा दावा टिकैत यांनी केला. 

१०० वेळा हल्ले झाले, तरी आंदोलन, महापंचायत थांबणार नाही; राकेश टिकैत यांचा एल्गार

दरम्यान, कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात आहे. शेतकरी नेत्यांची बोलण्यास तयार असल्याचेही केंद्राकडून सांगितले जात आहे. 
 

Web Title: rakesh tikait claims that bjp leaders are also joining us and kisan mukti abhiyan will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.