भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:08 IST2021-03-16T15:03:58+5:302021-03-16T15:08:04+5:30
west bengal assembly election 2021 - बंगालमधील बांकुरा येथे आयोजित रॅलीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी
बांकुरा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) प्रचाराला आता वेग आला आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, विविध ठिकाणच्या रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे पायाला फ्रॅक्चर झाले असतानाही, ममता दीदी मागे हटताना दिसत नाहीएत. बंगालमधील बांकुरा येथे आयोजित रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पाठ म्हणून दाखवला. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. (west bengal assembly election 2021 mamata banerjee criticised pm narendra modi and amit shah in bankura rally)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना त्यांनी बंकुरा येथील सभेला व्हीलचेअरवरून उपस्थिती लावली. मागील एका सभेत ममता बॅनर्जी यांनी चंडी पाठ म्हणून दाखवला होता. तर, मंगळवारी झालेल्या बंकुरा येथील रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पाठ म्हणून दाखवला.
#WATCH: West Bengal CM Mamata Banerjee recites 'Durga Path' during her public rally in Bankura.#WestBengalElectionspic.twitter.com/8RmsCcdgqN
— ANI (@ANI) March 16, 2021
पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका
आमच्याशी टक्कर घ्यायला जाऊ नका, मातीत मिसळून जाल. ज्यांना दुखापत झाली असेल, त्यांनाच त्याचे दुखणे कळते, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. मी दररोज २५ ते ३० कि.मी. चालते. डॉक्टरांनी मला आराम करण्यास सांगितले आहे. परंतु, तरीही मी बसून राहिले नाही. कारण मी आराम केला, तर भाजप जनतेला जे दुःख देईल, ते सहन करण्यापलीकडील असेल. ममता बॅनर्जी यांना रोखणे कठीण आहे, हे भाजपला माहिती आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला.
निवडणूक आयोग आणि भाजपचे कारस्थान
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका जाहीर करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही ममता बॅनर्जी यांनी टीका केली. भाजप आणि निवडणूक आयोगाचे हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी चक्रीवादळ, कोरोना संकटात पश्चिम बंगालची योग्य पद्धतीने मदत केली नाही, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका
पैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय
भाजपच्या रॅलीत कोणीही जायला तयार नाही. म्हणूनच भाजपकडून पैसे देऊन लोकांना सभेला आणले जात आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बंगाल निवडणुकांपेक्षा देशाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असा टोला लगावला. भाजपकडून पैसे वाटले जात असल्यास ते घ्या. पण मत मात्र तृणमूल काँग्रेसला द्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.