शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 18:05 IST

West Bengal Assembly Election 2021: भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे भाजपवर गंभीर आरोपबंगाली नागरिकांना शांतता हवी असल्याचे प्रतिपादनभाजपच्या टीकेला ममता बॅनर्जी यांचे प्रत्युत्तर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे. भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनीही शनिवारी एका सभेला संबोधित करताना भाजपवर पलटवार केला आहे. जगात भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असल्याचा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee alleged bjp biggest extortionist in the world)

ममता बॅनर्जी यांनी हल्दिया येथील रॅलीला संबोधित केले. भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असून, नोटबंदीपासून ते बँकबंदीपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना केवळ लुटण्याचे काम भाजपने केले, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

बंगालींना दंगामुक्त राज्य हवेय

पश्चिम बंगालची सत्ता भाजपला मिळता कामा नये. दंगलीचे षडयंत्र रचणे, हत्या करणे, दलित महिलांचे शोषण करणे अशा प्रकरणांमध्ये भाजपचे नाव वारंवार येत असते. बंगाली नागरिकांना दंगामुक्त राज्य हवे आहे. बंगालमध्ये शांतता नांदावी, असे वाटत असल्यास भाजपला मत देऊ नका, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तसेच नोटबंदी, पीएम केअर फंड यांबाबत पारदर्शकता आणून काही गोष्टी स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

शुभेंदू अधिकारींवर टीकास्त्र

काही बंडखोरांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता मला बरे वाटत आहे. आम्ही वाचलो, असा टोला ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता लगावला. बंगालमध्ये विकास झाला नाही, अशी टीका भाजपवाले करत आहेत. मग दिल्लीत तुम्ही काय केले, असा प्रतिप्रश्न ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून आठ टप्प्यात विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ५० ते ५५ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते, सुमारे तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून डाऊन आहे, अशी टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथील सभेला संबोधित करताना केली होती. त्यावर ममता बॅनर्जी यांनी पलटवार केला आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण