रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:50 PM2021-03-20T13:50:44+5:302021-03-20T13:52:51+5:30

West Bengal Assembly Election 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी खडगपूर येथे झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issues | रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींची ममता सरकारवर टीकाआता विकासाचा खेळ सुरू होणार - पंतप्रधान मोदीअब की बार बंगालमध्ये भाजप सरकार - पंतप्रधान मोदी

खडगपूर: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी (pm narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते, मंत्री पश्चिम बंगालच्या विविध भागांत प्रचारसभांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथे झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तिथे काल रात्री ४५ मिनिटे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झालं होतं. परंतु, बंगालमध्ये विकास डाऊन झालाय, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. (west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issues)

खडगपूर येथे आयोजित एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभागी होत जनतेला संबोधित केले. रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ५० ते ५५ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते, सुमारे तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून डाऊन आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. बंगालमध्ये अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. येथे केवळ एकच इंडस्ट्री सुरू आहे ती म्हणजे माफिया इंडस्ट्री, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

आता विकासाचा खेळ सुरू होणार

ममता दीदी म्हणतात खेळ संपला, पण सत्य हे आहे की, विकास सुरू होणार आहे. ममता बॅनर्जी सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यांनी यावेळी दिले. 

मराठा आरक्षण: आणखी किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार? सुप्रीम कोर्टाचा सवाल

अब की बार बंगालमध्ये भाजप सरकार

बंगालमध्ये ज्या पद्धतीने लोकांचं समर्थन मिळत आहे ते पाहता यावेळी राज्यात भाजप सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने भाजपला आशीर्वाद देण्यासाठी आलात हे माझं भाग्य समजतो, असे सांगत बंगालने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष या सर्वांना संधी दिली आहे. आता तुम्ही भाजपाला संधी दिलीत, तर खरं परिवर्तन कसं असतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.