शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

West Bengal Election 2021: EC चा ममता दीदींना दणका! २४ तासांकरिता निवडणूक प्रचारावर बंदी; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 8:44 PM

west bengal assembly election 2021: निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाची ममता बॅनर्जींवर कारवाई२४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदीकारवाईची तत्काळ अंमलबजावणी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. यातच निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. सोमवार रात्रौ ८ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. (election commission of india imposes ban of 24 hours on west bengal chief minister mamata banerjee)

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी एका प्रचार रॅलीदरम्यान हिंदू आणि मुस्लिम समाजावर वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. आदर्श आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे याची दखल घेत निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांकरिता निवडणूक प्रचारासाठी बंदी घातली आहे. 

तत्काळ प्रभावापासून बंदी लागू

निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावापासून बंदी लागू असल्याचे म्हटले आहे. सोमवार, १२ एप्रिल रात्रौ ८ वाजल्यापासून ते १३ एप्रिल रात्रौ ८ वाजेपर्यंत ही बंदी कायम असेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ पुढील २४ तास ममता बॅनर्जी कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकणार नाही. यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यावर निषेध नोंदवला आहे. 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

लोकशाहीसाठी काळा दिवस

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी एक ट्विट करत या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला असून, १२ एप्रिल... लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. निवडणूक आयोग म्हणजे मोदी कोड ऑफ कंटक्ट असल्याची टीका ममता दीदींनी केली होती.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण