west bengal assembly election 2021 election commission of india imposes ban of 24 hours on mamata banerjee | West Bengal Election 2021: EC चा ममता दीदींना दणका! २४ तासांकरिता निवडणूक प्रचारावर बंदी; 'हे' आहे कारण

West Bengal Election 2021: EC चा ममता दीदींना दणका! २४ तासांकरिता निवडणूक प्रचारावर बंदी; 'हे' आहे कारण

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाची ममता बॅनर्जींवर कारवाई२४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदीकारवाईची तत्काळ अंमलबजावणी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. यातच निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. सोमवार रात्रौ ८ वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे. (election commission of india imposes ban of 24 hours on west bengal chief minister mamata banerjee)

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी एका प्रचार रॅलीदरम्यान हिंदू आणि मुस्लिम समाजावर वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. आदर्श आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे याची दखल घेत निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांकरिता निवडणूक प्रचारासाठी बंदी घातली आहे. 

तत्काळ प्रभावापासून बंदी लागू

निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावापासून बंदी लागू असल्याचे म्हटले आहे. सोमवार, १२ एप्रिल रात्रौ ८ वाजल्यापासून ते १३ एप्रिल रात्रौ ८ वाजेपर्यंत ही बंदी कायम असेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ पुढील २४ तास ममता बॅनर्जी कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकणार नाही. यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यावर निषेध नोंदवला आहे. 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

लोकशाहीसाठी काळा दिवस

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी एक ट्विट करत या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला असून, १२ एप्रिल... लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. निवडणूक आयोग म्हणजे मोदी कोड ऑफ कंटक्ट असल्याची टीका ममता दीदींनी केली होती. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: west bengal assembly election 2021 election commission of india imposes ban of 24 hours on mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.