West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:33 PM2021-04-13T14:33:40+5:302021-04-13T14:35:26+5:30

west bengal assembly election 2021: निवडणूक आयोगाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

west bengal assembly election 2021 ecs imposed 48 hours ban on bjp leader rahul sinha and sends notice to dilip ghosh | West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई

West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा कारवाईचा धडाकादिलीप घोष, राहुल सिन्हा आणि सुवेंदू अधिकारी यांच्यावर कारवाईराहुल सिन्हांवर ४८ तासांची प्रचारबंदी, घोष यांना नोटीस

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचारसभांना वेग आला असून, कूचबिहार प्रकरणावर राजकारण चांगलेच तापले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने भाजप नेते राहुल सिन्हा यांच्यावर ४८ तासांसाठी प्रचारबंदी घातली असून, भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस बजावत तंबी दिली आहे. (ecs imposed 48 hours ban on bjp leader rahul sinha and sends notice to dilip ghosh)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यांचे मतदान झाले असून, पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभांना वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता निवडणूक आयोगाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातल्यानंतर भाजप नेते राहुल सिन्हा यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी घातली आहे. तसेच भाजप नेते दिलीप घोष यांना नोटीस पाठवण्यात आली असून, सुवेंदू अधिकारी यांना तंबी देण्यात आली आहे. 

ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात कारवाई

दिलीप घोष, राहुल सिन्हा आणि सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राहुल सिन्हा यांचे विधान आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर असल्याचे मान्य करत आयोगाने सिन्हा यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच दिलीप घोष यांनीही केलेल्या एका वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. तर, २९ मार्च रोजी दिलेल्या भाषणाची दखल घेत निवडणूक आयोगाने सुवेंदू अधिकारी यांना तंबी दिली आहे. 

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन

निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, कोलकात्यातील गांधी पुतळ्याजवळ त्यांनी धरणे दिले आहे. निवडणूक आयोगाने ममतांच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यावरून ही कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली असून, १३ एप्रिल रात्रौ ८ वाजेपर्यंत ही बंदी असेल.

संजय राऊतांचा पाठिंबा

संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा लोकशाही आणि भारताच्या स्वतंत्र संस्थांच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे. 
 

Web Title: west bengal assembly election 2021 ecs imposed 48 hours ban on bjp leader rahul sinha and sends notice to dilip ghosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.