ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:29 PM2021-04-13T13:29:19+5:302021-04-13T13:31:02+5:30

west bengal assembly election 2021: संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवत भाजपवर टीका केली आहे.

shiv sena sanjay raut criticised bjp over eci imposed ban on mamata banerjee | ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांचा ममता दीदींना पाठिंबाममता बॅनर्जींवरील कारवाईमागे भाजप असल्याचा दावाफक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमांचे पालन केले नाही का - राऊत

मुंबई: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. यातच निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला आहे. ममता दीदींवर झालेल्या कारवाईमागे भाजप असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. (sanjay raut criticised bjp over eci imposed ban on mamata banerjee)

संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा लोकशाही आणि भारताच्या स्वतंत्र संस्थांच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

निवडणूक आयोगाचा वेगवेगळा न्याय

यासंदर्भात पत्रकारांशीही बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा यासाठी भाजप जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षाकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. फक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमभंग केला आहे का, अशी विचारणा करत निवडणूक आयोग वेगळा न्याय लावत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये महाभारत

पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारे महाभारत सुरू आहे. महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाहीत. अगदी शिखंडीला पुढे करुन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये हे शिखंडी कोण आहेत ज्यांना पुढे करुन हे युद्ध खेळले किंवा लढले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी नियमभंग केला असेल, तर कोणीही कायदा आणि आचारसंहितेच्या वर नाही. पश्चिम बंगाल निवडणुकीतील शिखंडी कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. 

EC चा ममता दीदींना दणका! २४ तासांकरिता निवडणूक प्रचारावर बंदी; 'हे' आहे कारण

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली असून, १३ एप्रिल रात्रौ ८ वाजेपर्यंत ही बंदी असेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी धरणे आंदोलन सुरू केले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी एक ट्विट करत या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला असून, १२ एप्रिल... लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised bjp over eci imposed ban on mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.