शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 19:50 IST

west bengal assembly election 2021: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याचे आक्षेपार्ह विधानविधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूचभाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर टीएमसी कार्यकर्ते संतापले

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता एकमेकांवर आरोप करताना नेते मंडळी वादग्रस्त विधाने करायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली. ममता बॅनर्जी यांनी साडी नाही, तर बरमुडा घालावा, असे विधान भाजप नेत्याने केले आहे. (west bengal assembly election 2021 bjp leader dilip ghosh made disputed statement on mamata banerjee)

भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली. यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेनंतर ममता बॅनर्जी यांच्या पायाला मार लागला होता. तेव्हापासून ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून प्रचार करत आहेत. यावरून दिलीप घोष यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. 

सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

काय म्हणाले दिलीप घोष

प्लास्टर कापलेले आहे. क्रॅप बँडेज बांधलेले आणि पाय वर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेले कधीच कुणाला पाहिलेले नाही. तर मग बरमुडा का परिधान केला नाही, असे धक्कादायक विधान दिलीप घोष यांनी केले आहे. 

या माकडांना वाटते ते बंगाल जिंकतील?

टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून दिलीप घोष यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असे घोष यांनी म्हटले आहे आणि या माकडांना वाटते आहे की, ते बंगालमध्ये जिंकतील? अशी विचारणा महुआ मोईत्रा यांनी केली आहे. 

“आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

ममता दीदींनी मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, ममता बॅनर्जींना इतकंच वाटत असेल, तर त्यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक केला पाहिजे. दरम्यान, श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर असून, २ मे रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी