नंदिग्राममध्ये ममता-शुभेंदू अधिकारी यांच्यात रणसंग्राम, भाजपनं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 08:16 PM2021-03-06T20:16:25+5:302021-03-06T20:17:35+5:30

यापूर्वी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसने 291 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. याच बरबोर काँग्रेस, लेफ्ट आणि आयएसएफ आघाडीनेही 60 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. (West bengal assembly election - 2021)

West bengal assembly election 2021 bjp candidate list decleard Mamata Banerjee vs Suvendu Adhikari in Nandigram  | नंदिग्राममध्ये ममता-शुभेंदू अधिकारी यांच्यात रणसंग्राम, भाजपनं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

नंदिग्राममध्ये ममता-शुभेंदू अधिकारी यांच्यात रणसंग्राम, भाजपनं जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

Next

नवी दिल्ली - भाजपने (BJP) पश्चिम बंगाल विधानभा निवडणुकीसाठी (West Bengal Election) शनिवार (6 मार्च) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याकरिता एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. महत्वाचे म्हणजे नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे ममता आणि शुभेंदू अधिकारी (Mamata Banerjee vs Suvendu Adhikari) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. (West bengal assembly election bjp candidate list decleard Mamata Banerjee vs Suvendu Adhikari in Nandigram)

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. अरुण सिंह म्हणाले, केंद्रीय सूचना समितीने 57 जागांसाठी उमेदवारांच्या नावावर मोहर लावली आहे. नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे शुबेंदू आता नंदीग्राम येथून ममतांविरोधात निवडणूक लढतील हे निश्चित झाले आहे. याच बरोबर क्रिकेटर अशोक डिंडालाही तिकीट देण्यात आले आहे.

ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?



"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

यापूर्वी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसने 291 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. याच बरबोर काँग्रेस, लेफ्ट आणि आयएसएफ आघाडीनेही 60 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

ममता आणि अधिकारी या दोघांसाठीही हा बालेकिल्ला -
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम हा शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. पर्यायाने, ते तृणमूलमध्ये असताना हा तृणमूलचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जात होता. मात्र, आता शुभेंदू अधिकारी यांनी भाजपचा भगवा हाती घेतल्याने, ममतांसमोब हा बालेकिक्ला वाचविण्याचे मोठे आव्हाण आहे. यामुळेच त्यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी हाच मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे आता या तृणमूलच्या बालेकिल्ल्यात शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट रणसंग्राम होणार आहे. या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

'बंगालमध्ये हिंसाचाराने जनता त्रस्त, आता होतेय खरे परिवर्तन', भाजपत प्रवेश करताच त्रिवेदींचा ममतांवर हल्लाबोल

गालमध्ये कुठल्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान -
पश्चिम बंगालमधील 294 पैकी 30 जागांवर 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होईल, दुसऱ्या टप्प्यात 30 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 31 जागांसाठी, 6 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी 10 एप्रिलला पाचव्या टप्प्यात 45 जागांसाठी 17 एप्रिलला, सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी 22 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी 26 एप्रिलला तर आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर निकाल 2 मेरोजी लागणार आहे.

 

Web Title: West bengal assembly election 2021 bjp candidate list decleard Mamata Banerjee vs Suvendu Adhikari in Nandigram 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.