गर्लफ्रेंडसोबत शेतातील खोलीत गेला; वडिलांनी चोर समजून पोलिसांना बोलावले, दार उघडले तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:49 IST2025-09-18T17:48:29+5:302025-09-18T17:49:51+5:30
या घटनेची सध्या गावात प्रचंड चर्चा होत आहे.

गर्लफ्रेंडसोबत शेतातील खोलीत गेला; वडिलांनी चोर समजून पोलिसांना बोलावले, दार उघडले तेव्हा...
फतेहपूर: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी आपल्या मुलाला चोर समजून, त्याला आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रुममध्ये बंद केले. काही वेळानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांसमोर दार उघडले, तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ही घटना खाखरेरू पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात घडली. राधेश्याम नावाचा एक व्यक्ती दुपारी आपल्या शेतात आला. त्याला शेतातील खोलीतून काही संशयास्पद आवाज आले. त्याला वाटले खोलीत चोर शिरले आहेत. काहीही विचार न करता, त्याने बाहेरुन दार बंद केले आणि "चोर...चोर.." असे ओरडून जवळपासच्या लोकांना एकत्र केले.
आवाज ऐकून गावकऱ्यांची गर्दी घटनास्थळी जमली, कोणीतरी पोलिसांनाही बोलवण्यात आले. काही वेळातच पोलिस आले, त्यांच्यासमोर राधेश्याम यांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा चोरांऐवजी स्वतःचा मुलगा एका किशोरवयीन मुलीसह बाहेर आला. हे पाहून राधेश्याम यांना धक्का बसला.
यावेळी मुलीचे वडीलही तिथे आले होते. आपल्या मुलीला या अवस्थेत पाहून ते संतापले आणि मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राधेश्याम आणि त्यांच्या मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आहे.