बापरे! डीजेवरून वाद पेटला, भर मंडपात तुफान राडा झाला; एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 13:02 IST2022-06-11T12:56:49+5:302022-06-11T13:02:31+5:30
Crime News : एका लग्नात डीजेवरून दोन्हीकडची मंडळी भिडल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

बापरे! डीजेवरून वाद पेटला, भर मंडपात तुफान राडा झाला; एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, Video व्हायरल
नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. सोशल मीडियावर विविध हटके व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका लग्नात डीजेवरून दोन्हीकडची मंडळी भिडल्याचे पाहायला मिळाले. लग्नमंडपातच आधी वाद झाला आणि पुढे तुफान राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात डीजेवर डान्स करताना काही मुलं आपापसात भिडली. त्यांनी एकमेकांना थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
मुलं एवढ्यावरच थांबली नाहीत तर मंडपातील खुर्च्या देखील एकमेकांवर फेकल्या. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा एक व्हिडीओ तयार केला आणि आता तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुरादाबादच्या करुला जाहिद नगरमध्ये एका लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच वेळी डीजेवरून वर आणि वधुकडील मंडळींमध्ये वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओची पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन योग्य ती कारवाई सुरू केली आहे. वादामागचं नेमकं कारण काय याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन लग्नाच्या वेळी ही घटना घडल्याने मंडपात एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांना देखील धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.