शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

उत्तर प्रदेशमध्ये दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:03 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर दारू आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर दारू आणि शस्त्रसाठा जप्त केला. ४०५ अवैध हत्यारं, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांची दारू, दीड कोटींची रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

बुलंदशहर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी (१५ एप्रिल) दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर दारू आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलंदशहर जिल्ह्यात सोमवारी रात्री तपासणी दरम्यान  मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला. ४०५ अवैध हत्यारं, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांची दारू, दीड कोटींची रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्त्रसाठा हा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी नेते धनाच्या बळाचाही वापर करताना दिसत आहेत. देशात सहा टप्प्यांतील मतदान अद्याप बाकी आहे. या आधी केलेल्या कारवाईत ड्रग्स, दारू, सोने, चांदी, रोकड व अन्य वस्तू मिळून २,५०४ कोटींचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त केला आहे. सर्वाधिक मुद्देमाल गुजरातमधून हस्तगत करण्यात आला होता. 

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ४८,८०४ किलोपेक्षा अधिक ड्रग्स पकडण्यात आले आहे. याची किंमत १,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय २०७ कोटी रुपये किमतीची १०४ लाख लीटर दारू आणि ५०० कोटी रुपयांचे सोने, चांदी व अन्य धातू, तसेच ६४७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. गुजरातमध्ये सर्वाधिक ५१७ कोटी, तामिळनाडूत ४७९ कोटी, दिल्लीत ३९८ कोटी आणि आंध्र प्रदेशात २१६ कोटींचा बेहिशेबी मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक ५.६ कोटींचे १४,६७८ किलो ड्रग्स आणि जवळपास २० कोटी रुपयांची २६ लाख लीटर दारू पकडण्यात आली. अर्थात, सर्वाधिक किमतीचे ड्रग्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात गुजरातमध्ये जप्त करण्यात आले. येथे १२३ किलो ड्रग्ज पकडण्यात आले. याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. या राज्यात १० कोटींची दारूही जप्त करण्यात आली. राजधानी दिल्लीत २४९ आणि पंजाबमध्ये १५० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, देशभरात आतापर्यंत ६४७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १८३ कोटी तामिळनाडू, १३७ कोटी आंध्र प्रदेशमधून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर, तेलंगणा ६८ कोटी, उत्तर प्रदेश ३५ कोटी, दिल्ली ३२.५ कोटी आणि कर्नाटक ३० कोटी, याप्रमाणे रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी माहिती दिली की, आतापर्यंत सोने-चांदी यासारख्या मूल्यवान धातूंची जप्ती करण्यात आली आहे. याची किंमत ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात २४८ कोटी रुपयांचे धातू एकट्या तामिळनाडूत जप्त करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात ६८ कोटी, महाराष्ट्रात ४४ कोटी आणि आंध्र प्रदेशात ३३ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक