सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:55 IST2025-05-02T08:54:21+5:302025-05-02T08:55:28+5:30
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बोडो समुदायाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याचा शोध पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार घेईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणात केंद्रीय गृहमंत्री शहा बोलत होते. पहलगाम येथील हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता.
भारतातील ८२ टक्के कर्मचारी यावर्षी नोकरी बदलण्याच्या मानसिकतेत; वर्क-लाइफ बॅलेन्स
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बोडो समुदायाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दहशतवादाचे उच्चाटन
यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी आपल्या भाषणात, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प आहे आणि तो पूर्णत्वास जाईल यावर भर दिला. शहा म्हणाले की, ‘जर कोणी भ्याड हल्ला करून हा आपला मोठा विजय आहे असे समजत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, हे नरेंद्र मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. या देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प आहे.
दहशतवादाविरोधात आमची भूमिका स्पष्ट आहे. अशा गोष्टींचा पूर्णपणे बिमोड केला जाईल. प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. यातून कोणीही वाचणार नाही.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
जग भारतासोबत आहे...
गृहमंत्री म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. हे केवळ त्यांच्या कुटुंबियांचे दुःख नाही तर संपूर्ण देशाचे दुःख आहे. मी सर्वांना खात्री देतो की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेईल. जर गुन्हेगारांना वाटत असेल की ते जिंकले आहेत, तर ती गंभीर चूक ठरेल. आम्ही प्रत्येक पराभवाचा बदला घेऊ. देशाच्या कोणत्याही भागात दहशतवाद टिकू दिला जाणार नाही आणि तो मुळापासून नष्ट केला जाईल. आज, जागतिक समुदाय दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत उभा आहे."