"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:11 IST2025-07-01T13:10:46+5:302025-07-01T13:11:24+5:30

Priyank Kharge News: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी जर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेल आला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घातली जाईल, अशी घोषणा केली आहे.

"We will ban the Rashtriya Swayamsevak Sangh as soon as it comes to power at the Centre," a senior Congress leader Priyank Kharge gave a clear indication | "केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

काँग्रेसचे नेते आणि  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आपली लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीविरोधात असल्याचे वारंवार सांगत असतात. तसेच संघ देशात फूट पाडत असल्याचा आरोप करत असतात. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी जर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेल आला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घातली जाईल, अशी घोषणा केली आहे.

देशात कोण द्वेष पसरवत आहे, कोण घटना बदलण्याचे इशारे देत आहे, अशा शब्दात प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, संघ आपली राजकीय शाखा असलेल्या भाजपाला देशात बेरोजगारी का वाढत आहे? पहलगाम येथे दहशतवादी हल्ला कसा झाला? हे का विचारत नाही. आता आम्ही केंद्रात सत्तेत आलो की, कायदेशीर प्रक्रियेंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालू.

प्रियांक खर्गे पुढे म्हणाले की, ईडी, प्राप्तिकर विभाग आणि इतर सर्व तपास यंत्रा ह्या केवळ विरोधी पक्षांवरच कारवाया करण्यासाठी आहेत का? सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चौकशी का करत नाही. त्यांच्याकडे पैसा कुठून येतोय. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय? याची चौकशी का केली जात नाही. संघाचे लोक नेहमीच द्वेषपूर्ण भाषणं आणि घटनाबदलण्याचे दावे केल्यानंतरही कसे काय सुटतात, आर्थिक गुन्ह्यांमधून कसे वाचतात, याचीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही प्रियांक खर्गे यांनी केली.  

Web Title: "We will ban the Rashtriya Swayamsevak Sangh as soon as it comes to power at the Centre," a senior Congress leader Priyank Kharge gave a clear indication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.