Moradabad News:उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे आयोजित एका सभेत AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाचे प्रदेशअध्यक्ष शौकत अली यांनी लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. 'आम्ही दोघे, आमची दोन डझन' असा नारा देत त्यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.
शौकत अली म्हणाले, आमच्या लोकसंखेची एवढी भीती का वाटते? जे लोक स्वतः लग्न करत नाहीत, तेच आम्हाला मुले कशी वाढवायची याचे ज्ञान देतात. मला आठ मुले आहेत, माझ्या मोठ्या भावाला १६ मुले आहेत. माझी आई ९७ वर्षांची आहे आणि तिला किमान ७२ नातवंडे आहेत. काही लोक हिंदूंना चार मुले जन्माला घाला, असे सांगतात. आम्ही तर म्हणतो, हिंदूंनी चार नाही, १४ मुले जन्माला घातली पाहिजे, म्हणजे देश अजून मजबूत होईल.
मदरसे, धार्मिक ओळख आणि मॉब लिंचिंगचा मुद्दा
शौकत अली यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, आम्हाला आमच्या मुलांना दीनची (धार्मिक) तालीम देण्यापासून रोखले जाते. मुरादाबादमध्ये शेकडो मदरसे बंद करण्यात आले. आमच्या मदरशांना दहशतवादाचे अड्डे म्हटले जाते. आमची दाढी, टोपी, आमच्या मुलींचा नकाब आणि हिजाब ओढला जातो. २०१४ पासून आजपर्यंत गोमांसाच्या नावाखाली सुमारे २०० मुसलमानांची मॉब लिंचिंग झाली आहे. आधी हे काम हिंदू संघटना करत होत्या, आता त्यांच्या महिलांनीही आमच्या महिलांशी गैरवर्तन करायला सुरुवात केली आहे.
यूपीमध्ये २०० जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा
AIMIM यूपी प्रदेश अध्यक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मोठा दावा केला. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ विधानसभा जागा आहेत. त्यापैकी २०३ जागा आम्ही अखिलेश यादव यांच्यासाठी सोडणार आहोत, जेणेकरून ते त्या जागांवर भाजपला हरवू शकतील. उरलेल्या २०० जागांवर AIMIM निवडणूक लढवणार असून त्या ठिकाणी आम्ही भाजपला रोखू, असे शौकत अली म्हणाले.
लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया
यूपी महिला आयोगाच्या सदस्या बबीता सिंह यांनी ‘जिम आणि बुटीक हे लव्ह जिहादचे अड्डे आहेत’ असे केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शौकत अली म्हणाले, लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट नाही. उलट जबरदस्तीने मुस्लिम मुलींना हिंदू बनवले जाते. जेव्हा प्रेम होते, तेव्हा ते कोण थांबवू शकते का? आपल्या देशाचं संविधान याची परवानगी देते. अशा प्रकारची वक्तव्ये करून काही लोक हिंदू आणि मुसलमानांमध्ये आणखी मोठी दरी निर्माण करू इच्छितात. हे लोक देशाला गृहयुद्धाच्या दिशेने नेऊ पाहत आहेत. या वक्तव्यांमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Web Summary : AIMIM's Shaukat Ali criticized Mohan Bhagwat on population, defending Muslim birth rates. He accused the government of targeting madrassas and Muslims, alleging mob lynching. Ali claimed AIMIM would contest 200 UP seats, opposing 'Love Jihad' claims.
Web Summary : AIMIM के शौकत अली ने जनसंख्या के मुद्दे पर मोहन भागवत की आलोचना की और मुस्लिम जन्म दर का बचाव किया। उन्होंने सरकार पर मदरसों और मुसलमानों को लक्षित करने का आरोप लगाया और मॉब लिंचिंग का दावा किया। अली ने कहा कि AIMIM 200 यूपी सीटों पर चुनाव लड़ेगी और 'लव जिहाद' के दावों का विरोध करेगी।