शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

देशात रामराज्य आणा, असे आदेश आम्ही देऊ शकत नाही

By admin | Updated: August 27, 2016 05:26 IST

देशात रामराज्य आणा, असे आदेश आपण देऊ शकत नाही. इच्छा असूनही मर्यादित अधिकारांमुळे अनेक गोष्टी आपणास करता येत नाहीत,

नवी दिल्ली : देशात रामराज्य आणा, असे आदेश आपण देऊ शकत नाही. इच्छा असूनही मर्यादित अधिकारांमुळे अनेक गोष्टी आपणास करता येत नाहीत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपली हतबलता व्यक्त केली. रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणाच्या समस्येवरील याचिकेवर ते सुनावणी करीत होते. आम्ही निर्देश दिले की, सर्वकाही घडून येईल, असे तुम्हाला (याचिकाकर्ता) वाटते काय? आम्ही आदेश देताच देशातून भ्रष्टाचार गायब होईल, असे तुम्हाला वाटते काय, असा सवाल सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी केला. ‘आम्हाला अनेक गोष्टी कराव्या वाटतात; परंतु त्या करू शकत नाही. आमचे अधिकार मर्यादित आहेत आणि हीच समस्या आहे, असे न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी.वाय. चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या पीठाने म्हटले. याचिका फेटाळू नये, अशी विनंती करताना याचिकाकर्त्या एनजीओने हे न्यायालय कोणतीही कारवाई करणार नसेल किंवा आदेश देणार नसेल, तर ते कोण करणार, असा सवाल केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>लोकांमध्ये जागृती घडवासंपूर्ण देशात रस्ते व पदपथांवर प्रचंड अतिक्रमण झाले असून, प्रशासन काहीही करीत नसल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने तुम्ही याबाबत लोकांत जागृती घडवून त्यांना असे करण्यापासून परावृत्त करू शकता, असा सल्ला दिला. आपल्या याचिकेवरून २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला हा मुद्दा हाताळण्याचे निर्देश दिले होते याची आठवण याचिकाकर्त्याने न्यायालयाला करून दिली. त्यानंतर आपण याचिका फेटाळू, असे म्हणणाऱ्या पीठाने या याचिकेवर पुढील वर्षी फेब्रुवारीत सुनावणी ठेवली.>मी मोठ्या आशेने आलो होतो...रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणाची समस्या संपूर्ण देशात आहे, असे याचिकाकर्त्याने सांगितले. देशात सर्वकाही चुकीचे सुरू आहे या बाजूने आम्ही उभे राहू शकत नाही, असे सांगून न्यायालयाने ही याचिका फेटाळू, असे सांगितले. आधी उच्च न्यायालयाशी संपर्क साधा, असे पीठाने सुचविता याचिकाकर्त्याने मला किती उच्च न्यायालयांचे दरवाजे ठोठावे लागतील, असा प्रतिप्रश्न करून इथेच सुनावणी करावी, अशी विनंती केली. मी मोठ्या आशेने आलो होतो, असा उद्वेग याचिकाकर्त्याने व्यक्त केला.