शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 4:33 PM

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असे त्यांनी मत मांडले आहे.

ठळक मुद्देगुजरात निवडणूक हा शिकण्याचा मोठा अनुभव होता असे सांगत राहुल यांनी राजकीय नेत्यांचे लोकांशी असलेल्या नात्यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येत असतो, असेही स्पष्ट केले.काँग्रेसपक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल यांची या दोन निवडणुकांबाबतची मते प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ​​​​​​​

नवी दिल्ली- गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असे त्यांनी मत मांडले आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा राग-द्वेष संपवणारी वितारधारा आहे, ही विचारधारा प्रेमभाव ठेवणारी आणि संयम, शिस्तीने बोलणारी आहे. या विचारधारेला आपल्याला वाढवायचे आहे, असा संदेश राहुल यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.गुजरात निवडणूक हा शिकण्याचा मोठा अनुभव होता असे सांगत राहुल यांनी राजकीय नेत्यांचे लोकांशी असलेल्या नात्यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येत असतो, असेही स्पष्ट केले. काँग्रेसपक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल यांची या दोन निवडणुकांबाबतची मते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.राहुल या निवडणुकांबाबत म्हणतात, " गुजरातच्या निवडणुकीमधून मी एक शिकलो. आपल्या पक्षाने एकत्रितरित्या व चांगल्यापद्धतीने लढा दिला. अर्थात हिमाचल प्रदेशमध्ये असाच लढा देता आला नाही हे मला मान्य आहे. लोकांच्या आकांक्षांनुसार काम करणारेच चांगले राजकीय नेते होतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे." आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है " अशा प्रकारे राहुल यांनी या निवडणुकांचे मुल्यमापन करुन पक्षाला पुढील दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुद्द्यांना आपण लोकांपर्यंत घेऊन गेले पाहिजे. जे या निवडणुकीत यशस्वी झाले त्यांचे मी अभिनंदन करतो असेही या चिंतनामध्ये त्यांनी मत व्यक्त केले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Himachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017