शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकला भेडसावणार यंदा भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: October 13, 2016 04:51 IST

पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या असून, पुढच्या मान्सूनला अजून बराच अवकाश असल्यामुळे आगामी काळ कर्नाटकसाठी अत्यंत खडतर

बंगळुरू : पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या असून, पुढच्या मान्सूनला अजून बराच अवकाश असल्यामुळे आगामी काळ कर्नाटकसाठी अत्यंत खडतर राहू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कावेरी तंट्यावरील तोडग्याबाबत अनिश्चितता असली तरी येणारा उन्हाळा कर्नाटकसाठी भीषण राहील याबाबत पर्यावरणतज्ज्ञांमध्ये अजिबात दुमत नाही. पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकला आतापर्यंतच्या सर्वात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, असे पर्यावरणतज्ज्ञ दिनेश होल्ला यांनी सांगितले. होल्ला हे ‘सह्याद्री संचय’ संस्थेचे समन्वयक आहेत. ही संस्था पश्चिम घाटाच्या संवर्धनाचे कार्य करते. नेत्रावती आणि तिच्या उपनद्यांमध्ये फारच थोडे पाणी उरल्याचे पाहून आपल्याला धक्काच बसला, असे ते म्हणाले. आम्ही गेल्या २२ वर्षांपासून गिर्यारोहण करीत असून हा भाग आणि तेथे होत असलेल्या पर्यावरणीय बदलाची आम्हाला चांगली कल्पना आहे. सह्याद्री संचयतर्फे दरवर्षी पावसाळी गिरीभ्रमण आयोजित करण्यात येते. पश्चिम घाटात उगम पावणारी नेत्रावती नदी आणि तिच्या नऊ उपनद्या आणि ४२ ओहळ आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ओसंडून वाहत असतात; परंतु यावेळी हे चित्र नाही. एरवी धो धो वाहणारे नेत्रावतीचे धबधबे यंदा लक्षणीयरीत्या क्षीण झाले आहेत. पश्चिम घाटात सध्या जानेवारी-मार्चदरम्यान असते तशी परिस्थिती आहे. यावर्षी पहिल्यांदाच दक्षिण कन्नड जिल्हाही पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरा जातोय. पुढच्या मान्सूनपर्यंतचा काळ केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी भीषण ठरणार आहे, असा इशारा होल्ला यांनी दिला. सह्याद्री संचयच्या पथकाने मृत्युंजय नदीच्या काठावरील मधुगुंडी भागात अलीकडेच गिरीभ्रमण केले. चारमदी घाटातील मृत्युंजय नदी नेत्रावतीची उपनदी आहे. (वृत्तसंस्था)