शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

महाराष्ट्रात २२ हजार गावांमध्ये पाणीटंचाई, प्रतिव्यक्ती ४० लिटरपेक्षाही कमी पाणी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:27 IST

Water scarcity In Maharashtra News : प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या जलशक्ती मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात जवळपास २० टक्के लोकसंख्येला रोज किमान ४० लिटर पाणी उपलब्ध नाही.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रात २२ हजारांपेक्षा जास्त ग्रामीण भागात राहणारे लोक पाणीटंचाईला तोंड देत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असूनही या गावांत राहणाऱ्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किमान ४० लिटर पाणीदेखील रोजच्या रोज उपलब्ध होत नाही.प्रत्येक घरी पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी स्थापन झालेल्या जलशक्ती मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात जवळपास २० टक्के लोकसंख्येला रोज किमान ४० लिटर पाणी  उपलब्ध नाही. सरकारचा दावा मात्र जवळपास ७८ टक्के लोकसंख्येला दैनंदिन गरजांसाठी रोज ४० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे. केंद्र सरकार वर्ष २०२४ पर्यंत सगळ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारांसोबत काम करीत आहे. यासाठी जल जीवन मिशन सुरू केले गेले आहे.मिशनअंतर्गत विषम प्राकृतिक परिस्थिती, मरुस्तलीय तथा प्रभावित भागांत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ३० टक्के जास्त प्राधान्य दिले जात आहे. अधिकारी म्हणाला की, पाणीटंचाई कमी करण्यासाठी जल संरक्षणाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.  

मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशभर तीन लाखांपेक्षा जास्त ग्रामीण वसाहतींत पाण्याची उपलब्धता रोज दर माणसी किमान ४० लिटरपेक्षाही कमी आहे. त्यात १८.२७ कोटी लोक राहतात. 

राजस्थानचे २.४१ कोटी लोकसंख्या असलेली ५६ हजार ३०२, पश्चिम बंगालची २.७४ कोटी लोकसंख्येची ३६ हजार ७११, कर्नाटकची १.७३ कोटी लोकसंख्येची ३३ हजार ३४५ खेडी व जवळपास १.८७ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील २२ हजार ९७ गावांचा समावेश आहे. 

पाणी वाचवण्यासाठी कमीत कमी पाण्यात शेतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरले जात आहे. कृषी मंत्रालयावर ड्रॉप मोर क्रॉपच्या लक्ष्यासोबत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र