शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जलसंकट टळणार औज बंधारा: पातळी दोन दिवस कायम

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

सोलापूर :

सोलापूर :
दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने औज बंधार्‍यातील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे उजनीतून पाणी सोडेपर्यंत पाणी कपात करण्याच्या प्रस्तावाला ब्रेक लागला आहे.
औज बंधार्‍यातील पाणीपातळी खाली गेल्याने उजनीतून भीमेत पाणी सोडावे, यासाठी आग्रह वाढला होता. जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत 14 सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचे ठरले आहे. या तारखेला पाणी सोडले तर औज बंधार्‍यात येण्यासाठी 22 तारीख उजाडणार आहे. पण बंधार्‍यात 18 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतपत साठा होता. त्यामुळे तीन दिवसांच्या कालावधीसाठी शहरातील पाणी वितरण एक दिवसाने पुढे ढकलण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव होता. याबाबत 7 सप्टेंबर रोजी जलसंपदा मंत्र्यांनी पुण्यात बैठक बोलावली होती. परंतु रविवारी मुख्यमंत्री सोलापूर दौर्‍यावर आल्याने ही बैठक रद्द झाली. पण उजनीतून पाणी कधी सोडणार, हे अद्यापपर्यंत स्पष्ट न झाल्याने महापालिकेला नियोजन करण्यात अडचण येत होती.
अशात पावसाने सोलापूरवरील जलसंकट काहीसे कमी केले आहे. शनिवार व सोमवार अशा दोन दिवसांत औज बंधारा परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रविवारी पाणीपातळी 2. 25 मीटरवर गेली. पाणी उपसा होऊनही ही पातळी स्थिर राहिली. त्यात सोमवारी दुपारी पाऊस झाला. पाणीपातळी 2.30 मीटरवर गेली आहे. अशा प्रकारे पावसाने काहीअंशी सोलापूरकरांना दिलासा दिला आहे. आता बंधार्‍यातील पाणी 22 तारखेपर्यंत पुरेल अशी आशा आहे. अद्याप ढगाळी हवामान असून, मोठा पाऊस झाल्यास पाणीटंचाईचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
इन्फो..
पावसाने उत्सुकता वाढली
सोमवारी शहरात पावसाने हजेरी लावल्यावर सर्वजण सुखावले. उजनी धरण व औज बंधारा परिसरात पाऊस आहे काय अशी सर्वजण विचारणा करू लागले. महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे यांनी उत्सुकतेने पावसाबद्दल माहिती घेतली. औज बंधार्‍याची स्थिती काय असे जो तो विचारत होता. विशेष म्हणजे राज्य गुप्त वार्ता विभागाकडून पावसाची माहिती घेतली जात होती.