शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

दुष्काळाची छाया : २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के पाणी

दुष्काळाची छाया : २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के पाणी
पुणे : राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया दाट झाली आहे. मॉन्सूनमध्ये आगामी काळात पावसात पडणार्‍या मोठ्या खंडामुळे व कडक उन्हाच्या झळांमुळे खरिपाच्या पेरण्या जिरायती भागात धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राज्यातील छोट्या मोठ्या २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
ऑगस्टमध्ये मंदावत गेलेल्या पावसामुळे ही टक्केवारी कमीच राहिली असून दोन वर्षांपूर्वी याच सुमारास धरणांत ७५ टक्के तर गेल्या वर्षी याच तारखेला ६१ टक्के पाणी साठा होता. आजमितीस राज्य शासनाच्या २ हजार ५१० व खासगी १६ अशा एकूण २५२६ प्रकल्पांमध्ये प्रकल्पीय साठा ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. व उपयुक्त पाणीसाठा १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. आहे. त्याची टक्केवारी ४७ आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोकणातील १५८ प्रकल्पांमधील साठ्याची तुलनेने स्थिती बरी असून ८० टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ८ टक्के, नागपूरमधील ३६६ प्रकल्पांत ६७ तर अमरावतीमधील ४५३ धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमधील ३५० धरणांत ४० टक्के आणि पुणे विभागातील ३६९ प्रकल्पांत ५१ टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु अशा २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी.पाणीसाठा असून त्यापैकी केवळ १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. साठा उपयुक्त, म्हणजे पिण्यासाठी, शेतीसाठी वापर करण्याजोगा आहे. पावसाळ्याच्या आजपर्यंतच्या अडीच महिन्यांच्या एकत्रित पाणीसाठ्याची बेरीज ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. असून दोन वर्षांच्या तुलनेत तो खूपच कमी असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
२ हजार ८६९ धरण प्रकल्पांत गेल्या वर्षी १८ ऑगस्टच्या सुमारास २२ हजार ८६९ दशलक्ष घन मीटर (द.ल.घ.मी.) म्हणजे ६१ टक्के तर २०१३ मध्ये, दोन वर्षांपूर्वी याच तारखेला ७५ टक्के म्हणजे २८ हजार १७१ द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. मोठ्या धरणांची संख्या कोकण, मराठवाडा, नागपूर, अमरावती, नाशिक व पुणे विभागात ८४ असून त्यात ९ हजार १५६ द.ल.घ.मी , मध्यम प्रकल्पांची संख्या २२२ असून त्यामध्ये २ हजार ६५ द.ल.घ.मी तर लघु प्रकल्पांची संख्या २ हजार २०४ प्रकल्पांत १६३२ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे.