शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डाचा कानोसा -१

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

फोटो आहे... वॉर्डाचा कानोसा..-------------- पिवळी नदी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारखान्यामुळे प्रदूषण वाढले : २० वसाहतींना धुराचा फटका गरीबनवाजनगर : आशीनगर झोन अंतर्गत येत असलेल्या गरीबनवाजनगर प्रभागांतर्गत येणाऱ्या पिवळीनदी परिसरातील कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. तब्बल २० वसाहतींना या धुराचा फटका बसत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...


फोटो आहे...

वॉर्डाचा कानोसा..
--------------


पिवळी नदी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कारखान्यामुळे प्रदूषण वाढले : २० वसाहतींना धुराचा फटका


गरीबनवाजनगर :
आशीनगर झोन अंतर्गत येत असलेल्या गरीबनवाजनगर प्रभागांतर्गत येणाऱ्या पिवळीनदी परिसरातील कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. तब्बल २० वसाहतींना या धुराचा फटका बसत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पिवळी नदी परिसरात ३० पेक्षा अधिक कंपन्या आहेत. यातील काही कंपन्यांचा धूर सोडणाऱ्या चिमण्या या खूप कमी उंचीवर आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २२ वसाहतींना या धुराचा फटका बसतो आहे. या धुरामुळे धम्मानंदनगर, भीमवाडी, बम्लेश्वरीनगर, एकता नगर, पिवळी नदी, उप्पलवाडी, रमाईनगर, अरविंदनगर, संघर्षनगर, हामीदनगर, संगमनगर, वांजरा परिसर, पवननगर, यशोधरानगर या वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. साधारणत: २० ते २५ हजार नागरिकांना या प्रदूषणाचा त्रास होत आहे.
पिवळी नदीला लागून हे कारखाने आहेत. तर दुसऱ्या बाजुला वस्त्या आहेत. या परिसरात वीटभट्ट्याचे कारखाने, कोल डेपो, प्लास्टर ऑफ पॅरिस, सिमेंट वर्क रंग तयार करणे, इस्पातसारखे मोठे कारखाने आहेत. काही कंपन्यांमध्ये धूर बाहेर फेकणाऱ्या चिमण्या आहेत. चिमण्या या किमान १०० फूट उंचीवर असायला हव्या, परंतु काही कारखान्यामधील चिमण्या या कमी उंचीच्या आहेत. या कारखान्यामुळेच पिवळी नदी संपूर्णपणे प्रदूषित झाली आहे. आता विहीर आणि बोअरवेलचे पाणीसुद्धा प्रदूषित होऊ लागले आहे. परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तेव्हा याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

बॉक्स...

शारदा चौक ते कळमना पुलापर्यंतचे पथदिवे बंद

कळमना : शारदा कंपनी चौक ते कळमना पूल रिंगरोडपर्यंतचे पथदिवे बंद पडले आहेत. रात्री सर्वत्र अंधार असतो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक चालत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. दुचाकी आणि पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.