विरोधकांना मोठा धक्का! वक्फ विधेयकावरील मतदानापूर्वी BJD ने बदलली भूमिका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:37 IST2025-04-03T19:37:52+5:302025-04-03T19:37:52+5:30

लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होणार.

Waqf Amendment Bill Big shock to the opposition! BJD's neutral stance before the polls on Waqf Amendment Bill | विरोधकांना मोठा धक्का! वक्फ विधेयकावरील मतदानापूर्वी BJD ने बदलली भूमिका...

विरोधकांना मोठा धक्का! वक्फ विधेयकावरील मतदानापूर्वी BJD ने बदलली भूमिका...

Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकावर गुरुवारी (3 एप्रिल 2025) राज्यसभेत मतदान होणार आहे. पण, तत्पूर्वी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दलाने(BJD) विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. BJD ने ऐन मतदानापूर्वी वक्फ विधेयकाबाबत आपली भूमिका बदलली आहे. या विधेयकाला आधी विरोध करणाऱ्या पक्षाने आता आपल्या खासदारांना त्यावर मतदानाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. 

आधी विरोध, आता तटस्थ भूमिका
बीजेडीने याआधी या विधेयकाला तीव्र विरोध केला होता. पक्षाने या विधेयकाला अल्पसंख्याकांच्या हिताच्या विरोधात म्हटले होते. मात्र आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार असताना पक्षाने आपल्या खासदारांना त्यांच्या इच्छेनुसार मतदान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. नवीन पटनायक यांच्या पक्षाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आज राज्यसभेच्या मतदानासाठी कोणताही व्हीप जारी केला जाणार नाही. म्हणजे, पक्षाचे राज्यसभेतील खासदार त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान करू शकतात.

बीजेडीचे अधिकृत विधान
बिजू जनता दलाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने ट्विटरवर दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, "बिजू जनता दलाने नेहमीच धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांचे पालन केले आहे. आम्ही नेहमीच सर्व समुदायांच्या हक्कांचे रक्षण केले आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या विविध घटकांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आम्ही आदर करतो. ही मते लक्षात घेऊन आम्ही आमच्या सन्माननीय खासदारांना मतदानाच्या स्वातंत्र्याचा आणि न्यायाने निर्णय घेण्याचा अधिकार देत आहोत. याबाबत पक्ष कोणताही पक्ष व्हिप जारी करणार नाही.''

'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल

राज्यसभेचे गणित काय सांगते?
राज्यसभेत सध्या 236 खासदार आहेत. अशा परिस्थितीत विधेयक मंजूर करण्यासाठी एकूण 119 खासदारांची आवश्यकता असेल. आकडेवारी पाहिली तर एनडीएकडे अजूनही बहुमत आहे. भाजपचे 98 खासदार असून लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही JDU, TDP आणि NCP या पक्षांचा पाठिंबा आहे.

Web Title: Waqf Amendment Bill Big shock to the opposition! BJD's neutral stance before the polls on Waqf Amendment Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.