'सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद बंद करा', भाजप खासदाराची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:24 IST2025-04-19T13:24:22+5:302025-04-19T13:24:56+5:30
Waqf Amedment Act : वक्फ सुधारणा कायद्याचे प्रकरण सर्वोच न्यायालयात पोहोचले आहे.

'सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद बंद करा', भाजप खासदाराची नाराजी
Waqf Amedment Act : संसदेत पास झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचा अडथळा आला आहे. अशातच, वक्फ सुधारणा कायदा आणि पॉकेट व्हेटो प्रकरणावरील चर्चेदरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले निशिकांत दुबे?
झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातील भाजप खासदार निशिकांत दुबे सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद भवन बंद करावे.' त्यांच्या या विधानाचा रोख वक्फ कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे आहे.
क़ानून यदि सुप्रीम कोर्ट ही बनाएगा तो संसद भवन बंद कर देना चाहिये
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) April 19, 2025
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावरील सुनावणीपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, 'मला पूर्ण विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय कायदेशीर बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. उद्या जर सरकारने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केला तर ते चांगले ठरणार नाही.'