मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 09:29 IST2025-12-06T09:28:46+5:302025-12-06T09:29:14+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील नगपतजंग येथील शिक्षिका शिवानी कुमारी वर्मा हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी ४८ तासांत तपास करत मो. मारूफ आणि मो. सोहेलसह पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली महिला हुस्न हिला अटक केली आहे.

मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर
उत्तर प्रदेशमधील नगपतजंग येथील शिक्षिका शिवानी कुमारी वर्मा हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी ४८ तासांत तपास करत मो. मारूफ आणि मो. सोहेलसह पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली महिला हुस्न हिला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक देशी कट्टा, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी, आरोपींनी परिधान केलेले कपडे आणि चप्पल जप्त केले आहेत.
दरम्यान, याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी बीपीएससी शिक्षिका शिवानी कुमारी वर्मा हिची हत्या करायची नव्हती. तर त्यांनी सुपारी किलर्सनां दुसऱ्या एका शिक्षिकेची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. मात्र सदर शिक्षिका त्या दिवशी सुट्टीवर होती. तर हल्लेखोरांनी शिवानी यांनाच ती शिक्षिका समजून गोळ्या झाडल्या. त्यात शिवानी यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या हुस्न आरा हिला तिचा पती मो. साबीर याचे एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. क्या संशयातून हुस्न आरा हिने राजा आणि छोटू यांच्यासोबत मिळून सदर शिक्षिकेची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी मारूफ आणि सोहेल यांना ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती.
त्यानंतर ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास कन्हैली माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका शिवानी वर्मा हिची या आरोपींनी गोळ्या झाडूनहत्या केली. त्यानंतर पोलिसांनी या हत्येत सहभाग असलेल्या मोहम्मद मारुफ याला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी या हत्येसाठी वापरण्यात आलेला एक देशी कट्टा आणि दुचाकी जप्त केली.
याबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ज्या शिक्षिकेची सुपारी देण्यात आली होती. ती त्या दिवशी रजेवर होती. मात्र तिचा आणि शिवानी हिचा येण्याजाण्याचा रस्ता एकच होता. त्यामुळेच आरोपींनी शिवानी हिला तिच शिक्षिका समजून गोळीबार केला.