शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकीसाठी विठठल वाघ यांचा अर्ज

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. डॉ. श्रीपाल सबनीस, रविंद्र शोभणे आणि विठठल वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे, जनार्दन वाघमारे, यांची नावे चर्चेत असल्याने पिंपरी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. डॉ. श्रीपाल सबनीस, रविंद्र शोभणे आणि विठठल वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे, जनार्दन वाघमारे, यांची नावे चर्चेत असल्याने पिंपरी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
संमेलनाध्यक्षपदासाठी यापूर्वी ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ वाघ यांनी पुण्यातून तर रविंद्र शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघातून अर्ज भरल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे दिसते.
़ अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी वाघ यांचा अर्ज स्वीकारला. वाघ यांच्या अर्जावर सूचक म्हणून उद्धव कानडे यांची स्वाक्षरी आहे. तर अनुमोदक म्हणून डॉ. अनु गायकवाड, मुकुंद आवटे, दिगंबर ढोकले, दत्तात्रय अत्रे आणि अँड. विकास देशमुख यांच्या स्वाक्ष-या आहेत.
वाघ म्हणाले, साहित्यक्षेत्रात माझ्यापेक्षाही प्रतिभावंत लोक आहेत. त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे. मात्र, महामंडळाच्या तांत्रिक बाबींमुळे ना. ग. देशपांडे, रा. चिं. ढेरे, ना. धों. महानोर आणि मंगेश पाडगावकर हे दिग्गज या प्रक्रियेपासून लांब राहिले. मी 40 ते 50 वर्षे या क्षेत्रात आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहाखातर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. दुष्काळ असला तरी घरातले कार्यक्रम आपण करतो. साहित्य संमेलन हा मराठी समुदायाचा उत्सव आहे. त्यामुळे नवीन लोकांशी संपर्क होतो. वाचन कमी होत आहे, असे आपण म्हणतो. पण गेल्या काही संमेलनात पुस्तकांची विक्री कोटीच्या घरात गेली आहे. मराठीवर आक्रमणे होत आहेत. अनेक गोष्टी संमेलनातून घडत असतात. त्यामुळे संमेलने झाली पाहिजेत. संमेलनाध्यक्षपद हे साहित्यातील सर्वोच्च स्थान आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तसेच नाशिक येथे होणा-या संमेलनाच्या वेळी केशव मेश्राम यांनी अर्ज भरला होता. त्यावेळेस त्यांच्यासाठी मी माघार घेतली होती. तेव्हा मेश्राम हे बिनविरोध अध्यक्ष झाले होते. त्यावेळेस माघार घेताना मला आनंद झाला होता.
----------------------------------------------------------
नेमाडेंना सर्व मिळाले : वाघ यांचा टोला
साहित्य संमेलन हा रिकामटेकडयांचा उद्योग आहे, या ज्ञानपीठविजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता वाघ म्हणाले, डॉ. नेमाडे यांना साहित्य क्षेत्रात सगळे मिळाले आहे असा टोला त्यांनी लगावला.
--------------------------------------------------------