बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:58 IST2025-05-12T10:33:52+5:302025-05-12T10:58:44+5:30

गुरुग्राममधून एटीएम चोरीची घटना समोर आली. एटीएम न फोडताच १० लाख रुपये लुटल्याचे समोर आले.

viral news 10 lakh rupees withdrawn without breaking the ATM in Gurugram Bank and police didn't even know | बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना

बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना

एटीएम चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी एटीएम मशीन फोडूनही त्यातील पैसे काढता न आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. सध्या गुरुग्राममधून अशीच एक घटना समोर आली आहे. सेक्टर-३४ मधील रिको ऑटो इंडस्ट्रीजजवळील एटीएम न फोडता १० लाख रुपये चोरी करून फरार झाल्याची घटना समोर आले आहे. असा चोरीचा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर

दिल्ली-जयपूर महामार्गावर अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. यामध्ये दोन मशीन बसवल्या आहेत. हे एटीएम हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे देखभाल केले जाते. लिमिटेड, चेन्नई, तामिळनाडू येथील सिलिकॉन टॉवर येथे मुख्यालय आहे. या कंपनीत काम करणारे  गौरव कुमार यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांची कंपनी अ‍ॅक्सिस बँकेच्या या एटीएमची देखभाल करते. एटीएममध्ये १० लाख रुपये होते. ३० एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी पैसे न तोडता पळवून नेले, असं या तक्रारीत म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या एटीएममध्ये बसवलेले डीव्हीआर, बॅटरी आणि हार्ड डिस्क चोरट्यांनी चोरल्याचा आरोप आहे. एटीएममधून पीसी कोर आणि चेस्ट लॉक देखील गायब आहेत. सदर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. 

गुरुग्राम पोलिसांनी या कंपनीला नोटीस बजावली आहे. यामध्ये या चोरीच्या घटनेशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आली आहेत. देखभाल पथकातील कोणीतरी अधिकारी किंवा कर्मचारी या चोरांसोबत मिलीभगत असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रत्येक एटीएम एका अलार्मला जोडलेले असतात. यामुळे कोणतीही समस्या लगेच समोर येते. पण या प्रकरणात असे घडले नाही. रिको कंपनीचे आणि या एटीएमच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.

पहिल्यांदाच अशी चोरी झाली

एटीएम मशीनच्या चोरीचे असे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे.  एटीएम उघडण्यासाठी चावी आवश्यक असते आणि आतील डिजिटल लॉक उघडण्यासाठी पासवर्ड आवश्यक असतो. यामुळे या चोरीमध्ये कर्मचाऱ्याचा समावेश असण्याचा पोलिसांना संशय आहे.  चोरीच्या १० व्या दिवशी पैशांच्या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. हे एटीएम हॅक करून हॅकर्सनी ही रक्कम काढली आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

Web Title: viral news 10 lakh rupees withdrawn without breaking the ATM in Gurugram Bank and police didn't even know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.