शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

४९ लाखांची बोली लागलेला VIP नंबर अवघ्या सव्वा दोन लाखांत विकला; नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:20 IST

ज्या नंबरसाठी लिलावात तब्बल ४९ लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती, तोच नंबर अखेर अवघ्या २ लाख २२ हजार रुपयांत एका व्यक्तीला देण्यात आला.

वाहनांच्या फॅन्सी नंबरची क्रेझ सध्या तरुणाईत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. मात्र, उत्तर प्रदेशातील नोएडा आरटीओ कार्यालयात व्हीआयपी नंबरच्या लिलावाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या नंबरसाठी लिलावात तब्बल ४९ लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती, तोच नंबर अखेर अवघ्या २ लाख २२ हजार रुपयांत एका व्यक्तीला देण्यात आला. या व्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आरटीओ विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

गौतम बुद्ध नगर आरटीओ विभागातर्फे दरवर्षी '०००१', '०००७' आणि '०७८६' यांसारख्या अति-प्रीमियम नंबरचा ऑनलाइन लिलाव केला जातो. या लिलावाचा उद्देश सरकारला जास्तीत जास्त महसूल मिळवून देणे हा असतो. यावेळच्या लिलावात एका खास नंबरसाठी ४९ लाख रुपयांपर्यंत बोली गेली होती. इतकी मोठी रक्कम मिळणार असल्याने विभागाला विक्रमी महसुलाची अपेक्षा होती.

बोली लावली पण पैसे भरलेच नाहीत!

नियम असा आहे की, लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला एका ठराविक मुदतीत पूर्ण रक्कम जमा करावी लागते. मात्र, ज्याने ४९ लाखांची बोली लावली होती, त्याने ती रक्कम भरलीच नाही. त्यानंतर नियमानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या बोली लावणाऱ्याला संधी दिली जाते. पण या प्रकरणात धक्कादायक वळण मिळाले. सर्वात मोठी बोली लावणारे मागे हटल्यानंतर, तो प्रीमियम नंबर चक्क २ लाख २२ हजार रुपयांत देऊन टाकण्यात आला.

परिवहन विभागाचे स्पष्टीकरण

या गोंधळाबाबत एआरटीओ प्रशासनाचे अधिकारी नंदकिशोर यांनी सांगितले की, "अनेकांकडून लिलावात मोठी बोली लावली जाते, मात्र पैसे भरण्याच्या वेळी ते माघार घेतात. या प्रकरणातही दुसऱ्या क्रमांकाची बोली लावणाऱ्यानेही नंबर घेण्यास नकार दिला होता. या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आम्ही शासनाला पत्र लिहिणार आहोत."

मात्र, ४९ लाखांचा नंबर इतक्या कमी किमतीत कसा गेला? यामध्ये काही सेटिंग तर झाली नाही ना? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : VIP number auctioned for lakhs sold for peanuts; what happened?

Web Summary : A VIP number bid for ₹49 lakh in Uttar Pradesh was sold for just ₹2.22 lakh. The highest bidder didn't pay, and the second declined. Officials cite flawed system, promising reforms. Inquiry sought into potential irregularities.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसUttar Pradeshउत्तर प्रदेश