"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:39 AM2021-01-29T06:39:52+5:302021-01-29T06:40:18+5:30

काँग्रेसचा आरोप; दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

"Violence with the help of the Center on Republic Day; conspiracy to discredit the peasant movement" | "प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

"प्रजासत्ताकदिनी केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार; शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान"

googlenewsNext

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 
काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात यावे. जिथे हिंसाचार झाला त्याठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. याचा अर्थ ही सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर यंत्रणा हिंसक प्रकार रोखण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरली. 

सुरजेवाला यांनी सांगितले की, लाल किल्ल्यामध्ये दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांनी धुडगूस घातला. तिथे ध्वजस्तंभावर झेंडा फडकवला. या दीप सिद्धूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले आहे. दीप सिद्ध हा कोणाचा माणूस, याचे अनेक पुरावे समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. दीप सिद्धू व त्याच्या अनुयायांना अटक करण्याऐवजी त्यांना हिंसाचाराच्या घटनेनंतर लाल किल्ल्यातून जाऊ देण्यात आले.

‘हिंसाचार घडविणाऱ्यांचे केंद्राशी लागेबांधे’ 
शेतकरी आंदोलकांची माथी भडकविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या हस्तकांनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. अशा लोकांचे सत्ताधारी पक्षाशी संबंध आहेत, असा आरोप माकपने भाजपचे नाव न घेता केला आहे. हिंसाचार झाला असला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असे माकपने म्हटले आहे. 

Web Title: "Violence with the help of the Center on Republic Day; conspiracy to discredit the peasant movement"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.