‘विक्रम झाेपला आहे, झाेपू द्या, त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल’; इस्राेचे मंगळ, शुक्र, पुन्हा चंद्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:36 AM2023-10-17T06:36:52+5:302023-10-17T06:36:59+5:30

इस्राे सध्या प्रचंड व्यस्त आहे : डाॅ. साेमनाथ

'Vikram is in sleeping, let him sleep, he will be there when he wants'; ISRO | ‘विक्रम झाेपला आहे, झाेपू द्या, त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल’; इस्राेचे मंगळ, शुक्र, पुन्हा चंद्र...

‘विक्रम झाेपला आहे, झाेपू द्या, त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल’; इस्राेचे मंगळ, शुक्र, पुन्हा चंद्र...

चेन्नई : मंगळ, शुक्र आणि पुन्हा चंद्रावर...भारतीय अंतराळ संशाेधन संस्थेने (इस्राे) सध्या या महत्त्वाच्या माेहिमा आखल्या आहेत. याशिवाय भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ माेहिमेचीही तयारी सुरू आहे. त्यामुळे इस्राे सध्या प्रचंड व्यस्त आहे, असे इस्राेचे प्रमुख डाॅ. एस. साेमनाथ यांनी चेन्नई येथे सांगितले. 
इतर वैज्ञानिक माेहिमांवरही काम सुरू आहे. त्यामुळे सर्व बरेच व्यस्त असू, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

‘विक्रम झाेपला आहे, झाेपू द्या, त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल’
विक्रमने त्याचे काम चाेखपणे बजावले आहे. आता ताे चंद्रावर आनंदाने झाेपी गेला आहे. त्याची इच्छा हाेईल तेव्हा ताे जागा हाेईल, असे साेमनाथ यांनी सांगितले.

‘आदित्य-एल १’ही 
याेग्य मार्गावर
‘आदित्य-एल १’ यान पूर्णपणे स्वस्थ आहे. एकदा यान लॅग्रेंज बिंदूपर्यंत पाेहाेचले की हॅलाे आर्बिटमध्ये जाण्यासाठी आणखी करेक्शन केले जातील, असे डाॅ. साेमनाथ म्हणाले.

Web Title: 'Vikram is in sleeping, let him sleep, he will be there when he wants'; ISRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो