Delhi Violence : 'देशाला गुजरात बनवून टाकतील', विजेंदर सिंहची नाव न घेता मोदी-शाह यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 11:38 AM2020-02-29T11:38:31+5:302020-02-29T11:40:24+5:30

Delhi Violence : परेश रावल 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लोकसभा निवडणुकीत विजय झाले होते. तर 2019 मध्ये विजेंदर सिंहने 2019 मध्ये दक्षिण दिल्लीतील लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्याला पराभव पत्करावा लागला.

vijender singh and paresh rawal fights on delhi violence | Delhi Violence : 'देशाला गुजरात बनवून टाकतील', विजेंदर सिंहची नाव न घेता मोदी-शाह यांच्यावर टीका

Delhi Violence : 'देशाला गुजरात बनवून टाकतील', विजेंदर सिंहची नाव न घेता मोदी-शाह यांच्यावर टीका

Next

नवी दिल्ली - दिल्लीतील ईशान्य भागात झालेल्या कथित धार्मिक हिंसेत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेवर राजकारणापासून बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला अभिनेते परेश रावल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजेंदरने दिल्ली हिंसेनंतर ट्विट करत म्हटले की, संपूर्ण देशाला गुजरात बनवून टाकतील. अजुनही वेळ गेली नाही.' विजेंदरची ही टीका गुजरातचे नेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर होती. मात्र अभिनेता आणि माजी खासदार परेश रावल यांना विजेंदरचे ट्विट रुचले नाही. 

विजेंदरच्या ट्विटला रिट्विट करत परेश रावल म्हणाले की,  तुम्हाला बॉक्सिंग आणि बकवास अर्थात वायफळ बडबड यातील फरक समजायला हवा. यावर विजेंदरने पुन्हा प्रत्युत्तर दिले. 

परेश रावल यांना प्रत्युत्तर देताना विजेंदर म्हणाला की, सर बॉक्सिंग मला येते,  बकवास अर्थात वायफळ बडबड करणे दोन लोकांकडून शिकत आहे. सध्या देशात घडत असलेल्या घटनांवर सेलिब्रेटी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

परेश रावल 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लोकसभा निवडणुकीत विजय झाले होते. तर 2019 मध्ये विजेंदर सिंहने 2019 मध्ये दक्षिण दिल्लीतील लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्याला पराभव पत्करावा लागला.
 

Web Title: vijender singh and paresh rawal fights on delhi violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.