व्हिडीयो - हिंदूंसारखा हिजडा समाज नाही - गिरीराज सिंह

By admin | Published: August 4, 2016 05:20 PM2016-08-04T17:20:33+5:302016-08-04T18:14:06+5:30

वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी हिंदूंसारखा हिजडा दुसरा समाज जगात नसेल असे वक्तव्य केले आहे

Videos - There is no Hijda society like Hindus - Giriraj Singh | व्हिडीयो - हिंदूंसारखा हिजडा समाज नाही - गिरीराज सिंह

व्हिडीयो - हिंदूंसारखा हिजडा समाज नाही - गिरीराज सिंह

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी हिंदूंसारखा हिजडा दुसरा समाज जगात नसेल असे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान जिंदाबादचा नारा पाटण्यात दिला जातो असे उदाहरण देत हिंदू तसे नसते तर अशा घोषणा देणाऱ्यांना मार द्यायला पाहिजे होता असे सांगताना गिरीराज दिसत आहेत.
कोब्रापोस्टने हा व्हिडीयो रिलीज केला असून भारतात केवळ 20 टक्के लोक आहेत ज्यांच्याकडे भावना आहेत असे गिरीराज किशोर यांनी स्पष्ट केले आहे. पुढील 20 वर्षांमध्ये हिंदुंची आणखी दुर्गती होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भोजपूरमध्ये दिवसाढवळ्या पोलीसांसमोर हिंदूंची घरे जाळली पण कुणी बाहेर आले नाही असे गिरीराज या व्हिडीयोमध्ये सांगताना दिसत आहेत. सध्या तर काहीच नाही येत्या 20 वर्षांमध्ये हिंदुंची अवस्था आणखी बिकट होणार असल्याचे ते पुढे म्हणतात.
धर्मांतरण, लव जिहाद, घर वापसी, जेएनयू, बीफ अशा अनेक वादग्रस्त मुद्यांवर टिपण्णी करणारे गिरीराज सिंह तोंड उघडतात त्या त्यावेळी भाजपा अडचणीत येतो असा अनुभव आहे.

Web Title: Videos - There is no Hijda society like Hindus - Giriraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.