Video : तुम्ही तर शिवसेनेच्या 54 घोड्यांचा तबेलाच चोरला, शरद पवारांना शहांचं नवं आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:42 IST2019-11-27T16:35:40+5:302019-11-27T16:42:02+5:30
Video : 'जशी आमची युती होती, तशीच त्यांचीही आघाडी होती. आमच्यावर आरोप केले जातात की

Video : तुम्ही तर शिवसेनेच्या 54 घोड्यांचा तबेलाच चोरला, शरद पवारांना शहांचं नवं आव्हान?
नवी दिल्ली - राज्यातील भाजपा सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असं अमित शहांनी टोला लगावला. तसेच, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधींनाही शहांनी आव्हान दिलंय. तर, तुम्ही केलेली आघाडी म्हणजे घोडेबाजार असल्याचा आरोपही शहांनी केलाय.
एका माध्यमाशी बोलताना अमित शहा म्हणाले की, आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करतात. आम्ही कोणत्याही आमदारांना हॉटेलवर ठेवलं नाही, आमदारांना हॉटेलवर ठेवून एकमेकांशी हातमिळवणी करुन सरकार बनविणे म्हणजे भाजपाचा पराभव नाही. कोणत्या विचारधारेच्या बळावर हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केले पण मुख्यमंत्रिपद देऊन आघाडीने सरकार बनविले, पद देऊन सरकार बनविणे हा घोडेबाजार नाही का? असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला.
'जशी आमची युती होती, तशीच त्यांचीही आघाडी होती. आमच्यावर आरोप केले जातात की, आम्ही घोडेबाजार करतोय. एक-दोन घोडे सोडा, तुम्ही शिवसेनाच्या घोड्यांचा पूर्ण तबेलाच चोरी केलाय. मुख्यमंत्री पद देऊन तुम्ही शिवसेनेच्या 54 घोड्यांचा तबेलाच चोरलाय. यामध्येसुद्धा घोडेबाजार झालाच ना, मुख्यमंत्रीपद दिलंय असंच नाही केलं हे. हा खरेदी व्यवहार नाही का, पदाची लालच व्यवहार होत नाही का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व शिवसेनेचं समर्थन असं समजा. मी शरद पवार आणि सोनिया गांधींना आव्हान देतो की, जर हा घोडेबाजार नाही तर दोन्ही पक्षांचे मिळून 100 च्या जवळपास जागा होतायंत. तुमची आघाडी आहे, मग मुख्यमंत्री तुमचा बनवा, शिवसेनेचा नाही?. त्यामुळेच हा घोडेबाजार आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.'
मुख्यमंत्री पद का लालच देकर समर्थन लेना खरीद फ़रोख़्त नहीं है क्या?
— Amit Shah (@AmitShah) November 27, 2019
मैं शरद जी और सोनिया जी को कहता हूँ कि एक बार बोलकर देखे की मुख्यमंत्री उनका होगा और फिर शिवसेना का समर्थन लें।
लगभग 100 सीटों वाला गठबंधन 56 सीट वाली पार्टी को मुख्यमंत्री पद दे रहा है ये खरीद फ़रोख़्त ही है। pic.twitter.com/v2guJEy8ZH