भाजपा नेत्याने उचलली अमित शहांची चप्पल; TRS ने Video ट्विट करत साधला जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:14 IST2022-08-22T17:13:34+5:302022-08-22T17:14:44+5:30
अमित शाह सध्या हैदराबादमधील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तेलंगणा भाजपा प्रमुख बंदी संजय कुमार यांनी अमित शाहंच्या चपला आणल्या आणि त्यांना घालायला दिल्या.

भाजपा नेत्याने उचलली अमित शहांची चप्पल; TRS ने Video ट्विट करत साधला जोरदार निशाणा
भाजपा नेत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची चप्पल उचलल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या अमित शाहंना एका भाजपा नेत्याने चप्पल आणून घालायला दिल्याचा प्रकार घडला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह सध्या हैदराबादमधील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर तेलंगणा भाजपा प्रमुख बंदी संजय कुमार यांनी अमित शाहंच्या चपला आणल्या आणि त्यांना घालायला दिल्या. तेलंगणा राष्ट्र समितीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवरून टीकेची झोड उठवली आहे.
Telangana BJP state president MP Bandi Sanjay rushing to give foot-ware to his colleague MP Amit Shah!
— YSR (@ysathishreddy) August 22, 2022
Gulamgiri at its best 👇 pic.twitter.com/W1yXFI6zVZ
"तेलंगणासाठी अभिमान" म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामाराव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया नियंत्रक वाय सतीश रेड्डी यांनीही हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. "सर्वोत्तम गुलामगिरी" म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाने मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.