VIDEO- पाकिस्तानात शो करण्यास राजू श्रीवास्तवचा नकार

By Admin | Updated: September 25, 2016 08:47 IST2016-09-25T08:46:22+5:302016-09-25T08:47:41+5:30

जम्मू-कश्मीरयेथील उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांचा विरोध वाढत आहे. तर भारतीय कलाकारही आता पाकिस्तानात जाण्यास नकार देत आहेत

VIDEO - Raju Srivastava's denial to show in Pakistan | VIDEO- पाकिस्तानात शो करण्यास राजू श्रीवास्तवचा नकार

VIDEO- पाकिस्तानात शो करण्यास राजू श्रीवास्तवचा नकार

नवी दिल्ली, दि. 25- जम्मू-कश्मीरयेथील उरी हल्ल्यानंतर  भारतात पाकिस्तानी कलाकारांचा विरोध वाढत आहे. तर भारतीय कलाकारही आता पाकिस्तानात जाण्यास नकार देत आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी पाकिस्तानात शो करण्यास नकार दिला आहे.   

उरी हल्ल्याचा राग राजू श्रीवास्तव यांच्या मनात आहे. माझ्या जवानांच्या ह्त्येला जबाबदार असलेल्या लोकांना मी कसा काय हसवू शकतो असं त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ टाकून सांगितलं.

 
पाकिस्तानात मला कॉमेडी शो करण्यास बोलावलं होतं.  आमचे सेनिक रोज शहीद होत आहेत. पाकिस्तान नेहमी धोका देतं, कॉमेडी मनापासून करता येते, आताच्या परिस्थितीत मी कशाला जाऊ पाकिस्तानात तिथल्या लोकांना हसवायला. मी पाकिस्तानात जाणार नाही. असं राजू म्हणाले. 

Web Title: VIDEO - Raju Srivastava's denial to show in Pakistan