Video: तब्बल २.५ कोटींच्या पॅकेजची ऑफर; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यानं रचला नवा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:29 IST2026-01-07T17:28:05+5:302026-01-07T17:29:12+5:30
हे पॅकेज ना केवळ यावर्षीचे तर आयआयटी हैदराबादच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज आहे.

Video: तब्बल २.५ कोटींच्या पॅकेजची ऑफर; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यानं रचला नवा इतिहास
अलीकडेच आयआयटी हैदराबादच्या एका तरुणाची खूप चर्चा सुरू आहे. या तरुणाला २.५ कोटींचं पॅकेज ऑफर झालं होते. २.५ कोटींची जॉब ऑफर मिळाल्यानंतर चर्चेत आलेला Edward Nathan आता त्याच्या साधेपणाने बातम्यांमध्ये झळकत आहे. एडवर्डचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो त्याच्या टीचरसमोर शांतपणे त्यांचे म्हणणं ऐकून घेत आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा त्याला अडीच कोटींचे पॅकेज ऑफर झाल्यानंतर तो पहिल्यांदा आयआयटी हैदराबादच्या डायरेक्टर प्रोफेसर बीएस मूर्ती यांना भेटायला गेला होता.
यावेळी हा तरुण टीशर्ट आणि जीन्स घातलेला दिसतो. त्याला भेटायला येणाऱ्या लोकांसोबत तो अतिशय प्रेमाने त्यांचा आदरातिथ्य स्वीकारत आहे. आयआयटी हैदराबाद संस्थेकडून शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्यात. त्यात या तरुणाच्या साधेपणाचं लोक कौतुक करत आहेत. प्रोफेसर मूर्ती या विद्यार्थ्याचं अभिनंदन करत त्याने आपल्या संस्थेचे नावलौकिक केले, आम्हाला तुझा अभिमान आहे या शब्दात त्याच्यावर कौतुकाची थाप टाकतात.
हा विद्यार्थी त्याच्या यशाच्या प्रवासाचे अनुभव सांगतो, त्याला असा निकाल लागेल अशी अपेक्षा नव्हती. कॅम्पसमध्ये त्याच्या संपूर्ण काळात त्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक आणि शैक्षणिक परिसंस्थेचे आभार मानले. आयआयटी हैदराबाद येथील या विद्यार्थ्याला नेदरलँडमधील एका फर्मीकडून तब्बल २.५ कोटींची जॉब ऑफर दिली आहे. तो जुलैपासून ऑप्टिवरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करेल. हे पॅकेज ना केवळ यावर्षीचे तर आयआयटी हैदराबादच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज आहे.
आयआयटी हैदराबादची स्थापना २००८ साली झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला इतक्या मोठ्या पॅकेजची ऑफर मिळाली नाही. ही ऑफर या विद्यार्थ्याला इंटर्नशिपनंतर प्री प्लेसमेंट ऑफर म्हणून मिळाली आहे.