शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे एजंट; आधी शरीफांशी मैत्री, आता इम्रान खानशी दोस्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:55 IST

समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे सपा उमेदवार आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे

रामपूर - समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे सपा उमेदवार आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत अशी टीका आजम खान यांनी केली. रामपूरमध्ये जनसभेला संबोधित करताना आजम खान यांनी हा आरोप केला आहे. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी परदेशी पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होऊ शकते असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरुन आजम खान यांनी हा आरोप केला. यावेळी बोलताना आजम खान म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे असं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना वाटते. मग लोकांनी सांगावं पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित जनतेला केला. 

त्याचसोबत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतही तुमची मैत्री होती आणि आजचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी सुद्धा तुमची मैत्री आहे. तुम्ही आमच्यावर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप करता असं सांगत आजम खान यांनी पाकिस्तानचा एजंट मी आहे की कोण आहे असा प्रश्न विचारताच उपस्थित जनतेमधून मोदी मोदी उत्तर देण्यात आलं. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना परदेशी पत्रकारांनी भारताच्या निवडणुकीवर प्रश्न विचारला होता. यावेळी इमरान खान यांनी सांगितले होते की, जर भारतात पुन्हा नरेंद्र मोदी आणि त्याचा पक्ष भारतीय जनता पार्टी निवडणुकीत जिंकून आला तर भारत आणि पाकिस्तानमधील शांतता आणि काश्मीरसारखा प्रश्न सोडवण्याची चांगली संधी आहे. इमरान खान यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये इमरान यांच्याविरोधी पक्षाने टीका केली होती. तसेच भारतातही इमरान खान यांच्या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहे.  दरम्यान इमरान खान यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी सांगितले आहे. एअर स्ट्राईकवर संशय घेणारे पाकिस्तानचे भाषा बोलत आहेत अशी टीका भाजपाकडून करण्यात येते. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न होत असताना दिसून येत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीrampur-pcरामपूरUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019