Video: हत्येचा आरोप असलेल्या कैद्यानं तुरुंगात साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 19:21 IST2018-07-30T19:17:32+5:302018-07-30T19:21:41+5:30

तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आणून दिला केक आणि लायटर 

video Murder accused celebrates birthday in UP prison with cake and candles | Video: हत्येचा आरोप असलेल्या कैद्यानं तुरुंगात साजरा केला वाढदिवस

Video: हत्येचा आरोप असलेल्या कैद्यानं तुरुंगात साजरा केला वाढदिवस

लखनऊ: अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या उत्तर प्रदेशातील फैजाबाद तुरुंगात हत्येचा आरोप असलेल्या कैद्यानं वाढदिवस साजरा केला आहे. शिवेंद्र सिंह असं या आरोपीचं नाव आहे. 23 जुलैला शिवेंद्रनं तुरुंगात वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शिवेंद्र सिंग केक कापताना दिसत आहे. या केकवर शिवेंद्र सिंहचा फोटो छापण्यात आला होता. शिवेंद्रच्या वाढदिवसाचा केक ठेवण्यात आलेल्या टेबलवर गुलाबी रंगाचं लायटर आणि सुरीदेखील दिसत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील गृहराज्यमंत्री (तुरुंग प्रशासन) जय कुमार सिंह यांनी डीआयजींना या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासनदेखील त्यांनी दिलं आहे. 




वाढदिवस साजरा करण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्याला पैसे दिल्याचं आरोपी शिवेंद्रनं सांगितलं आहे. तुरुंगात लायटर, फोटो असलेला केक आणि सुरी घेऊन जाण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यानं एक लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवेंद्र आणि त्याचे वकील मार्तंड प्रताप सिंह यांनी केला आहे. तुरुंगात पैसे दिल्यावर सर्व सुविधा मिळतात, असंदेखील शिवेंद्रनं म्हटलं आहे. तुरुंगात वाढदिवस सुरू असताना आपण रजेवर होतो, असं तुरुंग अधिकारी विनय कुमार दुबे यांनी सांगितलं आहे. 

Web Title: video Murder accused celebrates birthday in UP prison with cake and candles