शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:48 AM

CoronaVirus कोरोनाचा धोका वृद्धांना अधिक आहे, असे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, कोरोनाचा धोका तरुणाईलाही असल्याचे मृत्यूंच्या आकडेवारीवरून दिसून आले.

श्रीकाकुलम : अवघे जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जगापेक्षा भारतात मृत्यूंची संख्या कमी असल्याने लोकांच्या मनातील भीती कमी होत आहे. मात्र, माणुसकी ठार मेल्यातच जमा झाली आहे की काय असा प्रश्न आंध्र प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित होऊ लागला आहे. 

कोरोनाचा धोका वृद्धांना अधिक आहे, असे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, कोरोनाचा धोका तरुणाईलाही असल्याचे मृत्यूंच्या आकडेवारीवरून दिसून आले. आंध्रप्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अमनवीय कृत्य केले आहे. 70 वर्षांच्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नेण्यासाठी माणसे धजावेनात. यामुळे जेसीबीने या वृद्धाचा मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  श्रीकाकुलम जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पलासा पालिका आयुक्त आणि स्वच्छता निरिक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे. या घटनेवरून कोरोनाने माणुसकी संपविल्याचे दिसून येत आहे. 

देशाला हादरवणारी आकडेवारी

देशात लॉकडाऊन उठविण्याचा दुसरा टप्पा तोंडावर आला असताना कोरोनाच्या आकडेवारीने भयभीत केले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे 18552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. धक्कादायक म्हणजे हा वेग प्रचंड आहे. गेल्या 24 तासांत विक्रमी वाढ पहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 197387 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 508953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15685 झाला आहे. 

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून दिल्लीचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिल्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल ५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १७५ मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६५ झाली असून बळींचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के झाले असून सध्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के इतका आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेश