Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:21 IST2025-05-17T13:21:00+5:302025-05-17T13:21:36+5:30
हे हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे हेलिकॉप्टर होते जे एम्स, ऋषिकेश येथून केदारनाथसाठी उड्डाण करत होते. त्यात दोन डॉक्टर आणि एक पायलट होता.

Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर क्रॅश झाले. केदारनाथ धामला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर अपघातात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. हेलिकॉप्टर वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात होते. तर काही दिवसापूर्वी उत्तरकाशीला जाताना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ६ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.
हे हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे हेलिकॉप्टर होते जे एम्स, ऋषिकेश येथून केदारनाथसाठी उड्डाण करत होते. त्यात दोन डॉक्टर आणि एक पायलट होता. केदारनाथ हेलिपॅडच्या २० मीटर आधी हेलिकॉप्टर कोसळले. तिन्ही जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी नुकतेच बद्रीनाथ धाम येथे एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
मे महिन्यात आतापर्यंत हेलिकॉप्टर अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत, यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ६ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. तर, बद्रीनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगमध्ये यात्रेकरू थोडक्यात बचावले. बद्रीनाथहून चमोली जिल्ह्यातील शेरसी येथे परतणाऱ्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे रैनका उखीमठ येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
उत्तरकाशीमध्ये ६ जणांचा मृत्यू
उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर अपघातात ६ जणांचा मृत्यू चार धाम यात्रेकरूंना गंगोत्री धामजवळ हर्षिलला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर गुरुवारी, ८ मे रोजी सकाळी उत्तरकाशीमध्ये कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. या अपघातात पायलट आणि पाच यात्रेकरूंचा मृत्यू झाला. मृतांमध्ये टीडीपी खासदार जी. लक्ष्मीनारायण यांची एक बहीणही आहे. तर वहिनी जखमी आहे. जखमींना एम्समध्ये दाखल करण्यात आले.