VIDEO : महिलांचे अंतर्वस्त्र चोरणारा सीसीटीव्हीत कैद

By Admin | Updated: March 22, 2017 09:51 IST2017-03-22T09:51:15+5:302017-03-22T09:51:15+5:30

महिलांची अंतर्वस्त्र घालून पळ काढणा-या विकृताविरोधात एका महिला हॉस्टेलनं तक्रार नोंदवली आहे.

VIDEO: Custody captures women's underwear | VIDEO : महिलांचे अंतर्वस्त्र चोरणारा सीसीटीव्हीत कैद

VIDEO : महिलांचे अंतर्वस्त्र चोरणारा सीसीटीव्हीत कैद

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 22 - बंगळुरूमधून एका विचित्र प्रकारच्या चोरीचा प्रकार समोर आला आहे.  शहरातील शेशाद्री रोडवरील महाराणी आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमधील महिला हॉस्टेलमध्ये राहणा-या मुलींच्या अंतर्वस्त्रांची चोरी होत असल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. केवळ अंतर्वस्त्रांची चोरीच नाही तर हा विकृत चोर ही अतर्वस्त्र घालून हॉस्टेल परिसरात वावरत असल्याचाही धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 
 
एक व्यक्ती रात्री-अपरात्री हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन त्यांचे अंतर्वस्त्र घालून पळ काढतो, अशी तक्रार मुलींनी पोलिसांकडे केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हॉस्टेल प्रशासनाने पोलिसांनी दिले आहे. सीसीटीव्हीत एक व्यक्ती महिलांच्या हॉस्टेलमध्ये घुसतो, त्यांची अंतर्वस्त्रं घालतो आणि पळ काढताना दिसत आहे. या विकृत आणि विचित्र घटनेमुळे हॉस्टेलमधील मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
(अमेरिकेनंतर ब्रिटनचीही विमानात इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर बंदी)
 
कॉलेजच्या मुख्याध्यापिका आर. शांताकुमारी यांनी सांगिलतलं की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा माणूस अनेक वेळा हॉस्टेलच्या परिसरात वावरताना दिसल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक वेळा संरक्षक भिंत ओलांडून तो रात्रीअपरात्री हॉस्टेलमध्ये शिरतो. खिडक्यांमधून रुममध्ये डोकावतो. या विकृताविरोधात आम्ही पोलिसात तक्रार नोंदवली आहे'.
 
दरम्यान, मुलींचे अंतर्वस्त्रे चोरणारा हॉस्टेल परिसरात रहात असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असून संबंधिताला लवकरच अटक केले जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

Web Title: VIDEO: Custody captures women's underwear