VIDEO: भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं; हवेत उडून १०० मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:39 IST2025-08-24T12:11:12+5:302025-08-24T12:39:43+5:30
दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर एका भरधाव कार चालकाने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

VIDEO: भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं; हवेत उडून १०० मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल
UP Accident: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर एका वाहतूक पोलिसाला चिरडल्याचा व्हिडिओ धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका भरधाव वेगाने येणारी कार वाहतूक पोलिसावर धडक देताना दिसत आहे. दिवसाढवळ्या एक्सप्रेसवेवर हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतरही कार चालकाने आपला वेग कमी केला नाही. वाहतूक पोलिसाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तेथे उपचार सुरू होते. या घटनेनंतर आता एक्सप्रेसवेवरील वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गाझियाबादच्या विजयनगर परिसरातील दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील आयपीएम कॉलेजच्या एक्झिट पॉईंटवर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस विपिन यांना एका कारने धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत विपिन यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान विपिन यांचा मृत्यू झाला. विजयनगर पोलिसांनी कारमधून प्रवास करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.
विपिन कुमार हे गाझियाबाद वाहतूक विभागात कॉन्स्टेबल होते. शुक्रवारी संध्याकाळी विपिन कुमार आयपीईएम कॉलेजसमोर वाहतूक व्यवस्थेच्या कर्तव्यावर होते. यादरम्यान, निष्काळजीपणे आणि वेगाने येणाऱ्या एका एर्टिगा कारच्या चालकाने विपिनला धडक दिली आणि त्याला चिरडले. त्याला धडक दिल्यानंतर चालक वेगाने कार घेऊन पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या विपिनला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. जखमी विपिन कुमारचा भाऊ अक्षय कुमारही वाहतूक पोलिसात आहे. अक्षय कुमारच्या तक्रारीवरून विजयनगर पोलिस ठाण्यात एर्टिगा कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे पर गाजियाबाद में तेज रफ्तार अर्टिगा ने ट्रैफिक पुलिसकर्मी विपिन कुमार को जोरदार टक्कर मारी 🚨
— Greater Noida West (@GreaterNoidaW) August 23, 2025
विपिन कई फीट हवा में उछले, हालत गंभीर।#Ghaziabad#DelhiMeerutExpresswaypic.twitter.com/uXHu44nXqv
पोलीस सीसीटीव्हीद्वारे कार चालकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर कारचालक आणि त्याच्या साथीदाराची ओळख पटवून दोघांनाही अटक करण्यात आली. विनीत कार चालवत होता आणि त्याचा मित्र सुमित देखील कारमध्ये होता. दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.