VIDEO: भाजपच्या आमदारालाच लुटण्याचा प्रयत्न, दीड तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:08 IST2026-03-05T17:07:39+5:302026-03-05T17:08:47+5:30

मुंबई ATS चा अधिकारी असल्याचे सांगून आमदाराला धमकावले!

VIDEO: Attempt to rob BJP MLA, kept under 'digital arrest' for one and a half hours | VIDEO: भाजपच्या आमदारालाच लुटण्याचा प्रयत्न, दीड तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले...

VIDEO: भाजपच्या आमदारालाच लुटण्याचा प्रयत्न, दीड तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले...

Digital Arrest: गेल्या काही काळापासून देशभरात डिजिटल अरेस्टच्या घटना वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार आता सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर-अमेठी मतदारसंघाचे भाजप आमदार (MLC) शैलेंद्र सिंह यांना सायबर ठगांनी सुमारे दीड तास ‘डिजिटल अरेस्ट’ करून फसवण्याचा प्रयत्न केला. 

मुंबई ATS अधिकारी असल्याचे सांगून धमकावले

मिळालेल्या माहितीनुसार, एमएलसी शैलेंद्र सिंह यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलिस (ATS) चा अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने असा दावा केला की, शैलेंद्र सिंह यांच्या नावावर कॅनरा बँकेत एक बनावट खाते उघडण्यात आले आहे आणि त्या खात्याचा वापर मनी लॉन्डरिंग तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांसाठी होत आहे.

खोलीत स्वतःला बंद करण्याचे आदेश

सायबर ठगांनी मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी आमदारांना व्हिडिओ कॉलवर घेतले आणि जवळपास 90 मिनिटे त्यांना बोलण्यात अडकवून ठेवले. या दरम्यान त्यांना घरातील एका खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करण्याच्या, कोणाशीही काही न बोलण्याच्या आणि आधार कार्ड व बँक खात्यांची गोपनीय माहिती देण्याची निर्देश दिले. 

नंबरची चौकशी करताच उघडकीस आला प्रकार

आमदार दीर्घकाळ खोलीत बंद असल्याने त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना संशय आला. त्यांनी कॉल आलेल्या नंबरची तपासणी केली. तपासात समोर आले की, तो नंबर मुंबई ATSचा नसून मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहे. फसवणूक उघडकीस आल्याचे लक्षात येताच ठगांनी तात्काळ कॉल कट केला.

सायबर पोलिसांत तक्रार

घटनेनंतर शैलेंद्र सिंह यांनी सुलतानपूर सायबर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अखिलेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, अज्ञात ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वापरलेला मोबाईल नंबर आणि आयपी अ‍ॅड्रेस शोधण्याचे काम सुरू आहे. सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Web Title : भाजपा विधायक डिजिटल गिरफ्तारी घोटाले का शिकार होने से बचे

Web Summary : उत्तर प्रदेश के भाजपा विधायक शैलेंद्र सिंह 90 मिनट तक 'डिजिटल गिरफ्तारी' घोटाले में फंसे रहे। साइबर ठगों ने मुंबई एटीएस अधिकारी बनकर मनी लॉन्ड्रिंग के लिए फर्जी बैंक खाते का दावा किया। शक होने पर कॉल मध्य प्रदेश से आने का पता चला। पुलिस में शिकायत दर्ज कराई गई है।

Web Title : BJP MLA Targeted in Digital Arrest Scam Attempt

Web Summary : Uttar Pradesh BJP MLA Shailendra Singh was trapped in a 'digital arrest' scam for 90 minutes. Cyber thugs impersonated Mumbai ATS officers, claiming a fake bank account was used for money laundering. Suspicion arose, revealing the call's origin in Madhya Pradesh. A police complaint has been filed.