Video : तीन वर्षीय चिमुकलीवर कोसळला काचेचा दरवाजा; उपचारापूर्वीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 19:20 IST2023-11-28T19:19:59+5:302023-11-28T19:20:57+5:30

या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Video : A glass door fell on a three-year-old child; Death before treatment | Video : तीन वर्षीय चिमुकलीवर कोसळला काचेचा दरवाजा; उपचारापूर्वीच मृत्यू

Video : तीन वर्षीय चिमुकलीवर कोसळला काचेचा दरवाजा; उपचारापूर्वीच मृत्यू

लुधियाना:पंजाबच्या लुधियानामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर जड काचेचा दरवाजा पडला. यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी आणि मुलीच्या कुटुंबीयांनी तिला दरवाजाखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लुधियानाच्या घुमर मंडी मार्केटमध्ये असलेल्या शोरुममध्ये 24 नोव्हेंबर रोजी रात्री 8.15 च्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना शोरुममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये चिमुकली काचेच्या दरवाजाजवळ खेळत असल्याचे दिसते, यावेळी दरवाजा मुलीच्या अंगावर पडतो. 

काच अंगावर पडल्याने मुलीला गंभीर इजा होते. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून उपस्थित लोक आणि मुलीचे कुटुंबीय तात्काळ तिला बाहेर काढतात. बेशुद्ध झालेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले जाते. तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या मृत्यूने पालकांना मोठा धक्का बसला आहे. 

 

Web Title: Video : A glass door fell on a three-year-old child; Death before treatment