VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्श ही करू शकली नाही आग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:22 IST2025-06-13T14:19:44+5:302025-06-13T14:22:35+5:30

चमत्काराची गोष्ट म्हणजे, ज्या अपघातात विमानातील सर्व साहित्य जळून खाक झाले, तेथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी आहे...

VIDEO A big miracle in the Ahmedabad plane crash The metal of the plane melted, but the fire could not even touch Bhagavad Gita | VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्श ही करू शकली नाही आग!

VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्श ही करू शकली नाही आग!


अहमदाबाद येथे गुरुवारी (१२ जून) दुपारी एअर इंडियाच्या विमानला भीषण अपघात झाला. यानंतर सुरू करण्यात आलेले बचावकार्यही जवळजवळ संपले आहे. या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या भीषण अपघातातून केवळ एकच व्यक्ती वाचू शकली. स्फोटानंतरच्या आगीत विमान आणि जवळफासच्या गोष्टींचे किती नुकसान झाले हे रेस्क्यूऑपरेशन दरम्यानच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, यावेळी बचाव पथकाला पवित्र भगवद्गीतेचीही एक प्रत सापडली. कदाचित कुणी प्रवासी हा ग्रंथ घेऊन प्रवास करत असावा. चमत्काराची गोष्ट म्हणजे, ज्या अपघातात विमानातील सर्व साहित्य जळून खाक झाले, तेथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी आहे. तेथे उपस्थित असलले लोक या घटनेला चमत्कार म्हणत आहेत. याला चमत्कार म्हणून पाहत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हडिओमध्ये एक व्यक्ती दुर्घटनास्थळावर आढळलेली एक भगवद्गीतेची प्रत आणि तिची पाने दाखवताना दिसत आहे. या भीषण अपघातात जवळपास पूर्णपणे जळालेल्या आणि तुकडे तुकडे झालेल्या विमानात भगवद्गीता सुखरूप आढळणे केवळ चमत्कारच मानले जात आहे. घटनास्थळी उपस्थित एक व्यक्ती भगवद्गीतेची पानं दाखवतानाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांच्या भावनांना स्पर्श केला आहे.


 
ही दुर्घटना, एअर इंडियाचे लंडनला निघालेले AI-171 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही काही सेकंदांतच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाला धडकले. या विमानात एकूण २४२ लोक बसलेले होते. यांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रमेश विश्वशकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. तो आपत्कालीन दरवाजाजवळील सीट क्रमांक ११A वर बसला होता आणि वेळ असतानाच विमानातून उडी मारण्यात यशस्वी झाला.

Web Title: VIDEO A big miracle in the Ahmedabad plane crash The metal of the plane melted, but the fire could not even touch Bhagavad Gita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.