नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार व सव्यसाची संपादक व ‘आऊटलूक’ नियतकालिकेचे संस्थापक संपादक विनोद मेहता यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. मेहता यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी दिली. मेहता यांनी २०११मध्ये ‘लखनौ बॉय’ हे आत्मचरित्र लिहिले होते. त्यांनी नुकतेच ‘एडिटर अनप्लग्ड’ नावाने आणखी एक पुस्तक लिहिले होते.
ज्येष्ठ संपादक विनोद मेहतांचे निधन
By admin | Updated: March 9, 2015 05:27 IST